बाजार समिती निवडणूक निकाल: जाणून घ्या सर्व अपडेट्स
29 Apr 2023 12:36 PM
Sambhajinagar APMC election Result
छत्रपती संभाजीनगर बाजार समिती भाजप- शिंदे गटाच्या ताब्यात
18 पैकी 11 सदस्य भाजप-शिवसेनेचे विजयी
छत्रपत्री संभाजीनगरमध्ये भाजपचा जल्लोष सुरू
नाशिकमध्ये महाविकास आघाडीच्या ‘आपला’ पॅनलची विजयी घौडदौड कायम
– ग्रामपंचायत गट आर्थिक दुर्बल प्रवर्गातून निर्मला कड या विजयी झाल्या आहेत.
– महाविकास आघाडीच्या ‘आपला’ पॅनलचा २ जागांवर विजय
चंद्रपूरमध्ये माजी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा दुसरा मोठा विजय
– चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल जाहीर झाला आहे.
– ब्रम्हपुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 पैकी 15 जागा काँग्रेसला मिळाल्या आहेत.
– काँग्रेस समर्थित शेतकरी विकास परिवर्तन पॅनलने 15 जागा जिंकल्या आहेत.
– भाजपा समर्पित शेतकरी परिवर्तन पॅनलला मात्र अवघ्या 03 जागांवर सामान मानावे लागले आहे.
– माजी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा या दुसरा मोठा विजय मानला जात आहे.
सांगली येथील विटा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत राष्ट्रवादी पिछाडीवर
– विटा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट), भाजप आणि काँग्रेस अशी युती झाली आहे.
– या निवडणुकीत युती आघाडीवर आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे पॅनल पिछाडीवर आहे.
– राष्ट्रवादी काँग्रेस पॅनल विरुद्ध शिवसेना,भाजपा आणि काँग्रेस आघाडी यांच्यात येथे लढत होत आहे.
– शिवसेना शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर, भाजपचे माजी आमदार पृथ्वीराज देशमुख आणि काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांनी एकत्रित येत हे पॅनल उभे केले होते.
वाशिम बाजार समिती मतमोजणी निकाल…
एकूण : 18 जागा
11 जागांचे निकाल जाहीर…
भाजपा – 00
राष्ट्रवादी – 02..
काँग्रेस – 04…
शिंदेगट – 01..
वंचित – 02…
शिवसेना ठाकरे गट – 02…
नंदुरबारात चंद्रकांत रघुवंशी यांची एकहाती सत्ता
नंदुरबार बाजार समितीवर शिवसेनेचा झेंडा
१८ पैकी १८ जागांवर विजय