बाजार समिती निवडणूक निकाल: जाणून घ्या सर्व अपडेट्स
एप्रिल २९,२०२३ १३:१० P.M.
Chalishaon APMC Election Result : भाजप, शिवसेनेची विजयी वाटचाल सुरूच
– चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप, शिवसेना, रिपाई, महायुती पुरस्कृत पॅनलची विजयी वाटचाल सुरूच…
– कृषी उत्पन्न बाजार समितीत मतदारांनी कपबशीला पसंती दिली आहे.
– भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्या समर्थकांचा पाचव्या जागेवर विजय झाला आहे.
– महाविकास आघाडी पुरस्कृत पॅनलने एका जागेवर खाते उघडले असून प्रदीप देशमुख व्यापारी गटातून विजयी झाले आहेत.
– भाजप , शिवसेना, रिपाईच्या कार्यकर्त्यांकडून गुलालाची उधळण करत जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे
Sangamner APMC Election Result : संगमनेर कृषी बाजार समितीत तिसऱ्या फेरीतही थोरातांच्या पॅनलची आघाडी
– तिसऱ्या फेरीत महाविकास आघाडीचे 3 उमेदवार विजयी
– 18 पैकी 11 जागांचा निकाल जाहीर
– 10 जागा महाविकास आघाडीला तर 1 जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे.
– विखे गटाला अद्याप एकही जागा मिळालेली नाही
– उर्वरित 7 जागांची मतमोजणी सुरू आहे
बारामतीत राष्ट्रवादीने गड राखला, राष्ट्रवादीचे 17 उमेदवार आघाडीवर
– पुरंदर नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीत महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर
– दौंडमध्ये खासदार संजय राऊत यांच्याविरोधात घोषणबाजी
– राहुल कुल यांच्या समर्थकांनी केली घोषणाबाजी
– आमदार राहुल कुल यांचे पॅनल आघाडीवर असल्याने कार्यकर्त्यांचा जल्लोष..
– इंदापूरमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीचे पॅनल निर्विवाद विजयी
Baramati APMC Election Result 2023
बारामतीत राष्ट्रवादीने गड राखला, राष्ट्रवादीचे 17 उमेदवार आघाडीवर
पुरंदर नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीत महविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर.
आमदार राहुल कुल यांचे पॅनल आघाडीवर असल्याने कार्यकर्त्यांचा जल्लोष.
इंदापूरमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीचे पॅनल निर्विवाद विजयी आघाडीवर.