बाजार समिती निवडणूक निकाल: जाणून घ्या सर्व अपडेट्स
एप्रिल २९,२०२३ १३:२० P.M.
अहमदनगर : कर्जत तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सर्वसाधारण गटातील ११ पैकी ७ जागा भाजपचे आमदार राम शिंदे यांच्या पॅनलने जिंकल्या, तर राष्ट्रवादीचे आमदार रोहितदादा पवार यांच्या पॅनलला ४ जागा.
नाशिक : येवला कृषी उत्पन्न बाजार समितीवर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचे वर्चस्व, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ पैकी १३ जागा मिळवत दोन अपक्षांसह एकूण १५ जागांवर भुजबळ यांच्या गटाचे उमेदवार विजयी.
Chalishaon APMC Election Result : भाजप, शिवसेनेची विजयी वाटचाल सुरूच
– चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप, शिवसेना, रिपाई, महायुती पुरस्कृत पॅनलची विजयी वाटचाल सुरूच…
– कृषी उत्पन्न बाजार समितीत मतदारांनी कपबशीला पसंती दिली आहे.
– भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्या समर्थकांचा पाचव्या जागेवर विजय झाला आहे.
– महाविकास आघाडी पुरस्कृत पॅनलने एका जागेवर खाते उघडले असून प्रदीप देशमुख व्यापारी गटातून विजयी झाले आहेत.
– भाजप , शिवसेना, रिपाईच्या कार्यकर्त्यांकडून गुलालाची उधळण करत जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे.
sambhaji nagar APMC Election Result : वैजापुर बाजार समितीवर भाजप शिंदे गटाची सत्ता
संभाजीनगर मधील वैजापुर बाजार समितीवर भाजप शिंदे गटाने 15 पैकी 10 जागा जिंकून सत्तेत आली आहे.
– महाविकास आघाडीला येथे 5 जागांवर समाधान मानावे लागले आहे.
या निवडणुकीत शिवसेना भाजपचे रामहरी बापू, काकासाहेब पाटील, कल्याण दागोडे, कल्याण जगताप, शिवकन्या पवार, नजन रजनीकांत, गणेश पोपटराव इंगळे, प्रवीण लक्ष्मण पवार, गोरख प्रल्हाद आहेर, प्रशांत उत्तमराव त्रिभुवन हे दहा उमेदवार विजयी झाले आहेत.
तर महाविकास आघाडीचे अविनाश गलांडे, संजय निकम, ज्ञानेश्वर जगताप, अनिता वाणी, प्रशांत सदाफळ असे पाच उमेदवार विजयी झाले आहेत.