नाशिक -२०/५/२३
Civil Hospital medical certificates Scam : अमरनाथ यात्रेकरूंच्या फिटनेस प्रमाणपत्रावर स्वाक्षरी केल्याच्या कारणाने आरोग्य वर्तुळात खळबळ उडाली.
अमरनाथ यात्रेकरूंच्या प्रमाणपत्रावर स्वाक्षरी करण्याची जबाबदारी सिव्हिल हॉस्पिटलमधील दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून अखेर काढून घेण्यात आली आहे. ‘‘फिटनेस’ पाचशे रुपयांत!’ याबाबत एम डी टी व्ही ने शासकीय रुग्णालयाच्या प्रशासनाकडे पाठपुरावा केला .. आणि प्रशासनाला कारवाई करण्यास भाग पाडले ..
ची दखल घेत गुरुवारीच तातडीने ही कारवाई करण्यात आली.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती ! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा.https://bit.ly/3UoK7E0
आता चार वैद्यकीय अधिकारी यात्रेकरूंच्या तपासणीची जबाबदारी पार पाडून ते यात्रेस जाण्याकरिता शारीरिकदृष्ट्या सक्षम आहेत की नाहीत याची खात्री करतील.
त्यानंतरच अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सकांनी केस पेपर व तपासण्यांचे रिपोर्ट तपासून यात्रेकरूंच्या प्रमाणपत्रावर स्वाक्षरी करावी, असे आदेश नाशिकच्या जिल्हा शल्यचिकित्सकांनी काढले आहेत.
पैसे घेऊन प्रमाणपत्रे वितरणाचा बाजार मांडणाऱ्या कर्मचाऱ्यांची नावे द्या, त्यांच्यावर कारवाई करू अशी ग्वाहीदेखील प्रशासनाने ‘एम डी टी व्ही ला दिली.
कोणतीही वैद्यकीय तपासणी न करता व केस पेपर न काढताच यात्रेला जाऊ इच्छिणाऱ्यांना अधिकाऱ्यांची स्वाक्षरी व शिक्क्यासह प्रमाणपत्रे दिली जात असल्याची पोलखोल एम डी टी व्ही ने केलेला . अमरनाथ यात्रा आव्हानात्मक असल्याने यात्रेकरू शारीरिक व मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे आवश्यक असते.
यात्रेला कोणी जावे व कोणी जाणे टाळावे याचे निकष सरकारने घालून दिले आहेत. या निकषांनुसारच आरोग्य तपासणी करून प्रमाणपत्रे वितरित झाल्यास अमरनाथ यात्रेत जिवावर बेतणारी जोखीम टाळता येऊ शकते.
परंतु, या निकषांनाच हरताळ फासत चिरिमिरीसाठी यात्रेकरूंचा जीव धोक्यात घातला जात असल्याचा प्रकार ‘स्टींग ऑपरेशन’द्वारे पुढे आणण्यात आला. यामुळे सिव्हिल हॉस्पिटलसह आरोग्य वर्तुळात खळबळ उडाली.याबाबत सिव्हिल हॉस्पिटल या ना त्या कारणाने चर्चेत आले .. नाशिक एम डी टी व्ही ने वारंवार यावर पाठपुरावा करून प्रशासनाला जाब विचारला ..
संबंधित कर्मचाऱ्यांसह प्रमाणपत्रांवर डोळे झाकून स्वाक्षरी करणारे डॉ. रोहन बोरसे आणि स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. शिकलगार या वैद्यकीय अधिकाऱ्यांचेही धाबे दणाणले.
प्रमाणपत्र वितरणात पारदर्शकता येण्यासाठी प्रभारी शल्यचिकित्सक डॉ. अरुण पवार यांना सूचना केल्याचेही थोरात यांनी सांगितले. त्यानुसार डॉ. पवार यांनी कोणत्याही भाविकाला केस पेपर न काढता, तसेच तपासणी न करता प्रमाणपत्र देऊ नये, असे स्पष्ट आदेश काढले आहेत.
आरोग्य तपासणीची जबाबदारीही चार वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे सोपविली आहे. यापैकी डॉ. भूषण पाटील यांनी प्रमाणपत्र घेण्यासाठी येणाऱ्याच्या आवश्यक त्या प्राथमिक तपासण्या करून घेणे बंधनकारक आहे.
त्यानंतर कामकाजाच्या दिवसानुसार डॉ. प्रमोद गुंजाळ, डॉ. गणेश चेवले, डॉ. अश्विनी सराफ संबंधित व्यक्तीच्या तपासणीबाबत खात्री करतील.
संबंधित व्यक्ती यात्रेसाठी जाण्यास शारीरिकदृष्ट्या सक्षम आहे की नाही हे प्रमाणित करतील.
त्यानंतर अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सकांच्या स्वाक्षरीने प्रमाणपत्र दिले जाईल.
” प्रमाणपत्र वितरणात सुसूत्रता आणत आहोत. यात्रेकरूंच्या आरोग्य तपासणीची जबाबदारी चार वैद्यकीय अधिकाऱ्यांवर असेल. संबंधित व्यक्ती यात्रेस जाण्यास शारीरिकदृष्ट्या सक्षम असल्याचे त्यांनी प्रमाणित केल्यावरच अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक प्रमाणपत्रावर स्वाक्षरी करतील. केस पेपर, तपासण्यांचा अहवाल व संबंधित यात्रेकरूची खातरजमा झाल्यावरच प्रमाणपत्र दिले जाईल.” -डॉ. अरुण पवार, प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक.. नाशिक
तेजस पुराणिक ,एम डी टी व्ही न्यूज ,नाशिक प्रतिनिधी