… मृत्यूनंतर केलं आईच देहदान,दिला कर्मकांडाला फाटा !

0
447

” त्यांचा देह डाॅ. वसंतराव पवार मेडिकल काॅलेजला सुपूर्त करण्यात आला. त्यांचे कोणतेही कर्मकांड करणार नसल्याची माहिती कृष्णा चांदगुडे यांनी दिली आहे.”

विधवा प्रथा निर्मूलनाचे शासनाने परीपत्रक काढल्यानंतर महाराष्ट्रात प्रथमच सुगंधाबाई यांनी त्याची अंमलबजावणी केली होती. विधवा असुनही त्यांनी टिकली ,मंगळसूत्र, जोडवे परिधान केले होते. चांदगुडे कुटुंबीयांनी याआधीही अनेक पुरोगामी निर्णय घेऊन समाजाला आदर्श घालून दिला.

ADVERTISEMENT

हे पण वाचा : – रामकुंडावर होते अस्थींची विटंबना

🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!

कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.

SPONSORED CONTENT
🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

सुगंधाबाई यांची आदरांजली सभा 12 फेब्रुवारी रोजी त्यांच्या मुळगावी चासनळी, ता-कोपरगाव येथे होणार आहे. यावेळी ‘देहदान व अवयवदान, काळाची गरज’ या विषयावर अवयवदान चळवळीचे कार्यकर्ता सुनील देशपांडे (उपाध्यक्ष,फेडरेशन ऑफ ऑर्गन अ‍ॅन्ड बाॅडी डोनेशन,मुंबई) यांचे व्याख्यान होणार आहे. 

” या प्रसंगी मरणोत्तर देहदानाची इच्छा असणाऱ्या व्यक्तींचे फाॅर्म भरून घेणार असल्याचे कृष्णा चांदगुडे यांनी सांगितलंय.”

अवयवदान हेच सर्वश्रेष्ठ दान

आपल्याकडे मृत्यूनंतर विधीवत अंत्यसंस्कार करून पार्थिवाची विल्हेवाट लावली जाते. अंत्यसंस्कारानंतर मानवी शरीरातील जे अवयव गरजूंना पुनर्जन्म देऊ शकतात, असे लाखमोलाचे अवयव पंचतत्त्वात विलीन होतात. यासाठी रुग्णालयात होणाऱ्या मृत्यूनंतर अवयवदानाचे प्रमाण वाढले, तर गरजू रुग्णांचे जीवन सुखकर होऊन त्यांना नवसंजीवनी मिळू शकते. संपूर्ण भारतात अवयवदानाचे महत्त्व व तशी चळवळ उभी राहणे काळाची गरज आहे. भारतासारख्या अफाट लोकसंख्येच्या देशात अवयवदानाचे प्रमाण इतर देशांच्या तुलनेत सर्वांत कमी आहे.

तेजस पुराणिक जिल्हा प्रतिनिधी एम डी टी व्ही न्यूज,नाशिक

RECOMMENDED FOR YOU

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here