नाशिक -२६/५/२३
नाशिकमध्ये जिल्हा रुग्णालयात एका ट्रेनी डॉक्टरने जिवंत रुग्णाला मृत घोषित केल्याचा प्रकार समोर आला आहे.
जिल्हा रुग्णालयातल्या जळीत कक्षात त्याच्यावर उपचार सुरू होते.
त्यावेळी जिवंत असूनही मृत घोषित केले आणि नंतर जेव्हा रुग्ण उठून बसला तेव्हा एकच खळबळ उडाली.
संबंधित रुग्ण ९३ टक्के भाजल्याने रुग्णालयात उपचार सुरू होते. आता या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांनी दिले आहेत.
याबाबत एम डी टी व्हीने दूरध्वनीवरून जिल्हा शल्य चिकित्सकांशी संपर्क साधून संबंधितांवर कारवाई होण्याबाबत चर्चा केली ..
याबाबत मिळालेली माहिती अशी की, नाशिकच्या अशोक स्तंभ परिसरात एका व्यावसायिकाने स्वत:ला पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. यात ९३ टक्के भाजल्यानतंर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी त्यांना दाखल करण्यात आलं होतं.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
पण गुरुवारी सकाळी साडे सहाच्या सुमारास त्यांची हालचाल बंद झाली. तेव्हा वॉर्डमध्ये असणाऱ्या ट्रेनी डॉक्टरने त्यांची तपासणी केली. यात ईसीजी रिपोर्ट फ्लॅट आल्यानं नातेवाईकांना त्यांचे निधन झाल्याचं सांगितलं. याबाबत रुग्णालयाच्या पोलीस चौकीतही रुग्णाच्या मृत्यूची माहिती देऊन पुढील प्रक्रिया सुरू केली गेली.
दरम्यान, सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास वॉर्डमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्याला मृत रुग्णाच्या पायांची मंद हालचाल असल्याचं दिसलं. तेव्हा रुग्णाचा पुन्हा ईसीजी काढला गेला आणि रुग्ण जिवंत असल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले.
रुग्णाच्या कुटुंबीयांनाही ही माहिती देताच त्यांना आनंद झाला. पण आधी चुकीची माहिती दिल्याने नातेवाईकांनाी संतापही व्यक्त केला.
आधी मृत आणि नंतर जिवंत घोषित केल्यानंतर उपचार सुरू असताना तासाभराने पुन्हा रुग्णाचे हृदय बंद पडले.
तेव्हा डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केल्याने हृदय सुरू झाले.
प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अरुण पवार यांनी सांगितले की, गंभीररित्या भाजलेल्या रुग्णावर उपचार करणं हे अत्यंत जिकिरीचे असते. एकावेळी अनेक समस्या निर्माण होत असतात. वैद्यकीय क्षेत्रात चमत्कारावर विश्वास ठेवला जात नाही पण काही घटना दुर्मीळ असतात.
रिपोर्टनुसार रुग्णाचा मृत्यू झाला पण तो अवघ्या काही क्षणांसाठी होता.
तेजस पुराणिक ,जिल्हा प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज ,नाशिक