ब्रेकिंग -शरद पवारांचा केजरीवालांना पाठिंबा ..

मुंबई -२६/५/२३

आज मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांना भेटण्यासाठी आलेले दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंदजी केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि आम आदमी पार्टीचे नेते व पदाधिकारी यांचे स्वागत केले.

ADVERTISEMENT

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!

कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.

SPONSORED CONTENT
🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

यावेळी सोबत राज्याचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार,माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, खा. सुनील तटकरे यांच्यासह राज्यातील नेते उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी स्वागत केले.

9aada1aa 772a 4e91 b8c3 50896e087bda
5a05d246 36b4 4fa8 9f0a 562fb44f46e0

याप्रसंगी सर्व विरोधी पक्षांनी देशातील लोकशाही वाचविण्यासाठी एकजुटीने लढण्याचा निर्धार व्यक्त केला.

यावेळी सोबत खा. प्रफुल्ल पटेल, राज्याचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, खा. सुनील तटकरे, खा. सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, खा. श्रीनिवास पाटील, खा. वंदना चव्हाण यांच्यासह दिल्लीच्या शिक्षणमंत्री अतिशी मार्लेना, आम आदमी पक्षाचे खा. राघव चढ्ढा, खासदार संजय सिंग आणि राज्यातील नेते उपस्थित होते.

विविध विषयांवर सखोल मंथन करण्यात आलं ..
दिल्लीतील प्रशासकीय सेवांचे नियंत्रण सुप्रीम कोर्टाने केजरीवाल सरकारकडे सोपवलं होत ..
ते अध्यादेश मोदी सरकारने काढून घेतलं
या अध्यदेशाबाबत संसदेत विधेयक मांडले जाणार असून राष्ट्रवादीने केजरीवालांच्या आप ला जाहीर पाठिंबा दर्शवला ..
त्यामुळे हा मोदींना जबरदस्त धक्का पवारांनी दिल्याचं मानलं जातं ..

तेजस पुराणिक नाशिक प्रतिनिधींसह एम डी टी व्ही न्यूज ब्युरो,मुंबई

RECOMMENDED FOR YOU

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here