BREAKING : शरद पवारांनी बॉम्ब फोडला .. अजित पवार शपथविधी..

अजित पवारांच्या शपथविधीला पाठिंबा नव्हता..

मुंबई -२/५/२३

ADVERTISEMENT

शरद पवार यांनी आपल्या राजकीय आत्मकथेतून २०१९ मधील विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या राजकीय भूकंपाबाबत पहिल्यांदाच सविस्तर भाष्य केलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या राजकीय आत्मकथेची सुधारित आवृत्ती प्रकाशित करण्यात आली आहे.

SPONSORED CONTENT

यशवंतराव चव्हाण सेंटर येथे या पुस्तकाचे प्रकाशन आज करण्यात आले. शरद पवार यांच्या राजकीय आयुष्यातील २०१५ ते नंतरच्या काळातील घडामोडींची मांडणी या पुस्तकात सविस्तरपणे करण्यात आलेली आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा.

https://bit.ly/3UoK7E0

याच पुस्तकाच्या माध्यमातून २०१९ मधील विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात झालेल्या राजकीय भूकंपाबाबतही पवार यांनी पहिल्यांदाच सविस्तर भाष्य केलं आहे.

🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!

कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.

🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

अजित पवार यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत घेतलेली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ हा माझ्यासाठी मोठा धक्का होता, असं शरद पवार यांनी या पुस्तकात नमूद केलं आहे. तसंच तेव्हा घडलेला संपूर्ण घटनाक्रमही पवार यांनी पुस्तकातून उलगडला आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय हालचाली वेगानं घडत होत्या.

सरकारस्थापनेचा मार्ग प्रशस्त झाला असतानाच एक अभूतपूर्व वळण महाराष्ट्राच्या राजकारणात आलं.

२३ नोव्हेंबरच्या सकाळी ६.३० वाजता माझ्या निवासस्थानी फोन खणखणला.

राष्ट्रवादीचे काही आमदार राजभवनात पोचलेले असून, अजित पवार यांनी भाजपाला राष्ट्रवादीचा पाठिंबा असल्याचं पत्र सादर केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर अजितदादा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत, अशी माहिती मला देण्यात आली.

तो मोठा धक्का होता. ‘महाविकास आघाडी’चं सरकार बनवण्यासाठी राष्ट्रवादीचा पुढाकार असतानाच हे घडणं, म्हणजे आमच्या सर्वांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह होतं,’ असं म्हणत शरद पवार यांनी पहाटेचा शपथविधी आपल्या परवानगीशिवाय झाला असल्याचा दावा केला आहे.

अजित पवार यांनी भाजपसोबत हातमिळवणी केल्यानंतर शरद पवार यांच्या भूमिकेबाबतही संभ्रम निर्माण झाला होता.

याबाबतचा उल्लेख करत शरद पवार यांनी हा संभ्रम दूर करण्यासाठी आपण थेट उद्धव ठाकरेंना फोन केल्याचं सांगितलं आहे. ‘शपथविधीबाबत मी थोडी माहिती घेतल्यावर लक्षात आलं, जेमतेम दहाच आमदार अजितबरोबर गेले आहेत.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा.

https://bit.ly/3UoK7E0

त्यांच्यापैकीच एक- दोघांशी फोनवर बोलल्यानंतर लक्षात आलं, की हे माझ्या संमतीनंच घडत असल्याची त्यांची समजूत करून देण्यात आली होती. काही मिनिटांतच मी सावरलो. घडलेलं धक्कादायक तर होतंच, परंतु दिशाभूल करून घडवण्यात आलं होतं.

महाविकास आघाडीचा यशस्वी होऊ घातलेला पट उधळून लावण्यासाठी केंद्र सरकार, राजभवन आणि राज्यातल्या भाजपानं केलेला हा रडीचा डाव होता. यातून राजकीय कंड्या पिकण्याआधी, हा गोंधळ निस्तरणं आवश्यक होतं.

मी पहिला फोन उद्धव ठाकरेंना केला आणि राजभवनात पहाटे घडलेल्या नाट्याची त्यांना कल्पना दिली.

त्यांना ही माहिती सर्वप्रथम माझ्याकडूनच मिळत होती. अजितनं उचललेलं पाऊल अत्यंत गैर असून, याला राष्ट्रवादी काँग्रेसचा अजिबात पाठिंबा नाही, असं मी त्यांना निःसंदिग्ध शब्दांत सांगितलं,’ असं ‘लोक माझे सांगाती’ या आपल्या राजकीय आत्मकथेत पवार यांनी म्हटलं आहे.

एम डी टी व्ही न्यूज ब्युरो,मुंबई

RECOMMENDED FOR YOU

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here