राज्यातील सत्तासंघर्षाच्या निकालासंदर्भातील प्रत्येक Live Update :

0
163

मुंबई/दिल्ली -११/५/२३

राज्यातील सत्तासंघर्षांवर आज सर्वोच्च न्यायालय निकाल देणार आहे.

16 आमदारांच्या अपात्रतेबाबत सुप्रीम कोर्ट काय निकाल देणार? यावर महाराष्ट्राचं राजकीय भवितव्य अवलंबून आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल अवघ्या काही तासांवर आलेला आहे. सकाळी 11 वाजता हा निकाल येणार आहे.

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठापुढे सुरू आहे. त्यात स्वतः सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड, यांच्यासह न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यामूर्ती हिमा कोहली, न्यायमूर्ती एम. आर. शहा, न्यायमूर्ती पी. एस. नरसिंहा यांचा समावेश आहे. 

राज्यातील सत्तासंघर्षांवर आज सर्वोच्च न्यायालय निकाल देणार आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत सुप्रीम कोर्ट काय निकाल देणार? यावर महाराष्ट्राचं राजकीय भवितव्य अवलंबून आहे

न्यायालयाचा निर्णय काही येवो , मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदेच राहतील

उद्धव ठाकरेंना मुंगेरीलाल के हसीन सपने पाहायची सवय

त्यामुळे आज रात्री उद्धव ठाकरे शांत झोपतील

– भाजप आमदार मंगेश चव्हाण

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली न्यायमूर्ती एम. शाह, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती पी.एस. नरसिम्हा या पाच जणांचे घटनापीठ देणार महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा ऐतिहासिक निकाल.

विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ नॉट रिचेबल असल्याची चर्चा, सत्तासंघर्षाच्या निकालाला उरले अवघे काही तास

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल, गृह विभागाकडून पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचना. निकालानंतर वाद उफाळण्याची शक्यता, पोलिसांकंडून खबरदारी

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या निकालाच्या धामधुमीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीची नोटीस, सोमवारी चौकशीला बोलावले

जीवन पाटील ,तेजस पुराणिकसह एम डी टी व्ही न्यूज ब्युरो ,मुंबई /दिल्ली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here