मुंबई/दिल्ली -११/५/२३
Maharashtra Political Crisis Suprme Court Hearing: संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या राज्यातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालय निकाल देणार आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रतेसह सत्तासंघर्षातील महत्त्वाच्या घडामोडींबाबत न्यायालय निकाल देणार आहे.
या निकालावर शिंदे गट आणि ठाकरे गटाची भविष्यातील राजकीय वाटचाल अवलंबून आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठ सकाळच्या वेळेत राज्य सरकारचे भवितव्य ठरवणारा महत्त्वाचा निकाल देईल.
शिवसेनेत फूट पडल्यावर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या राज्यातील सत्तांतरानंतर गेले १० महिने सुरू असलेल्या राज्यातील सत्तासंघर्षाचा न्यायालयीन निर्णय आज, गुरुवारी देण्यात येणार आहे.
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठ यावरील ऐतिहासिक आणि दूरगामी निकाल देणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालावर ठाकरे आणि शिंदे गटाची भविष्यातील राजकीय वाटचाल अवलंबून असेल.
सकाळी साधारण ११ वाजण्याच्या सुमारास सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड निकालाचे वाचन करतील. पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने एकमताने अंतिम निकालावर शिक्कामोर्तब केले आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय येणार. १६ आमदार अपात्र ठरल्यास राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता.
धाकधूक वाढली; ज्या १६ आमदारांच्या भविष्याचा फैसला होणार, त्यांची राजकीय कारकीर्द एका क्लिकवर
शिवसेना कुणाची? सत्तासंघर्षाचा आज होणार फैसला; ऐतिहासिक निकालाकडे अवघ्या देशाचे डोळे
शिवसेनेमध्ये फूट पडली की नाही? पक्षांतर बंदी कायद्याच उल्लंघन झाले का, हे आजच्या निकालाने स्पष्ट होईल. शिंदे गटातील आमदार अपात्र ठरले तर शिंदे सरकारला पायउतार व्हावे लागेल.
विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास नोटीस बजावली असेल तर त्यांना कारवाईचे अधिकार आहेत का? त्यांचे अधिकार कधीपासून खंडित होतात? सर्वोच्च न्यायालय देणार निकाल
सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे सत्ताबदल झाला असेल घड्याळाचे काटे उलटे फिरवून राज्यपालांचा निर्णय रद्द करता येईल का?
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल एकमताने येण्याची शक्यता असून सरन्यायाधीश चंद्रचूड हा निकाल वाचून दाखवणार आहेत. घटनेच्या दहाव्या अनुसूचीतील पक्षांतर बदी कायद्यासंबंधी हा निकाल येणार आहे. १९७३ सालच्या केशवानंद भारती खटल्याप्रमाणे आजचा निकाल हा एक लँडमार्क जजमेंट असण्याची शक्यता आहे.
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली न्यायमूर्ती एम. शाह, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती पी.एस. नरसिम्हा या पाच जणांचे घटनापीठ देणार महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा ऐतिहासिक निकाल.
विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ नॉट रिचेबल असल्याची चर्चा, सत्तासंघर्षाच्या निकालाला उरले अवघे काही तास..
जीवन पाटील ,तेजस पुराणिकसह एम डी टी व्ही न्यूज ब्युरो ,मुंबई /दिल्ली..