हे सरकार लफंग्यांना पाठिशी घालणारे: संजय राऊतांची टीका..

0
217

पुणे -२७/४/२३

दौंड येथे भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याच्या कथित गैरव्यवहाराविरुद्ध आयोजित सभेला जाण्यासाठी संजय राऊत पुण्यात आले होते.

या वेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले…

कृषी मंत्री दादा भुसे यांच्यासह दौंड येथील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षांवर गैरव्यवहाराचे आरोप आहेत.

सरकार यांच्यावर कारवाई करणार नसेल, तर विरोधी पक्षांच्या नेत्यांवर केलेल्या खोट्या कारवाया मागे घ्याव्यात,’ असे खासदार संजय राऊत बुधवारी पुण्यात म्हणाले.

लफग्यांना पाठिशी घालणारे हे सरकार आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

राऊत म्हणाले, ‘देशभरात विरोधी पक्षाचे अनेक नेते किरकोळ कारणांवरून तुरुंगात आहेत.

प्रत्येक ठिकाणी विरोधी पक्षाचे आमदार, आजी-माजी मंत्र्यांवर कारवाई होत आहे. तपास यंत्रणा किरकोळ व्यवहारांवरून संबंधित नेत्यांच्या कुटुंबांपर्यंत पोहोचत आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारशी संबंधित दोन प्रकरणे आपण उघडकीस आणली आहेत.

कृषी मंत्री दादा भुसे यांनी मालेगावच्या ‘गिरणा कारखाना बचाव’ या नावाखाली शेतकऱ्यांकडून कोट्यवधी रुपये गोळा केले आहेत.

हा अधिकृत आकडा शंभर कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे.

त्या पैशांचे काय झाले, तो कारखाना कुठे आहे? या चौकशीची मागणी केली की, आम्ही नशेत असल्याची टीका सरकारकडून होते.’

जनता, शेतकरी अडचणीत’

‘आमची लढाई आमदार राहुल कुल यांच्याविरोधात नाही.

दौंडच्या भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षांनी ५०० कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या प्रकरणाच्या चौकशीसाठी दहा पत्रे पाठवली असून, त्यांच्याकडे भेटीची वेळ मागितली आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा.

https://bit.ly/3UoK7E0

उपमुख्यमंत्री म्हणतात, की ते गृहमंत्री झाल्यापासून काही लोकांची अडचण झाली आहे.

सामान्य जनता, शेतकऱ्यांची अडचण झाली असून, या सरकारमध्ये लफंगे खूश आहेत,’ अशी टीका राऊत यांनी केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दीर्घ रजेवर जाण्याची वेळ आली असून, त्यांना पाठवले जाईल.

त्याचा सराव ते सध्या करीत आहेत, असा टोलाही राऊत यांनी लगावला.

पुणेहून एम डी टी व्ही न्यूज ब्युरो

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here