बोर्डाची परीक्षेत 10 मिनिटं कपातीवर बोर्डाकडून मोठा खुलासा; वेळ तेवढीच फक्त या पद्धतीमध्ये केला बदल…

0
252

मुंबई:१४/०२/२०२३

 यंदा दहावीची दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना 10 मिनिटं वेळ वाढवून द्या अशी मागणी मुख्याध्यापकांनी केली होती. याआधी पेपरफुटी टाळण्यासाठी विद्यार्थ्यांना परीक्षा सुरू झाल्यावरच पेपर वाटण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मात्र या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना वेळ कमी मिळेल, त्यामुळे त्यांना पुढील 10 मिनिट वाढवून द्यावी अशी मागणी करण्यात आली होती.

तसंच बोर्डाच्या परीक्षेतविद्यार्थ्यांना दहा मिनिटं कमी मिळतील असं म्हणण्यात आलं होतं. मात्र आता यावर खुद्द बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी खुलासा केला आहे.

यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना दहा मिनिटं गमवावी लागणार आहे. पूर्वी परीक्षेआधी दहा मिनिटं विद्यार्थ्यांना पेपर दिला जात होता. वाढत्या पेपरफुटीच्या घटनांमुळं आता ही पद्धत बंद केली जाणार आहे. दहावीच्या परीक्षा वेळेत कुठेही कपात केली नसल्याचा खुलासा बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी एम डी टी व्ही शी बोलतांना केलाय.

मग खरा निर्णय आहे तरी काय?

यापूर्वी मुलांना पेपर लिहायला सुरू करण्याआधी प्रश्नपञिका व्यवस्थित वाचता यावी, यासाठी जो 10 मिनिटांचा कालावधी दिला जायचा नेमकं त्याच दरम्यान पेपर फुटीचे प्रकार वाढू लागल्याने ही दहा मिनिटे रद्द केली गेल्याचं गोसावी यांनी म्हटलंय.

विद्यार्थ्यांना परीक्षेच्या पहिल्या मिनिटाला हातात प्रश्नपत्रिका दिली जाणार आहे. सकाळी 11 वाजताच्या पेपरला अर्धा तास आधी 10.30 वाजता तर दुपारी 3 वाजताच्या पेपरला 2.30 वाजता हजेरी लावावी लागणार आहे.

कॉपीमुक्त परीक्षा पॅटर्नचा एक भाग म्हणून ही पद्धत लागू करण्यात येणार असल्याचं शिक्षणमंत्र्यांनी सांगितलंय. कॉपी परीक्षा पद्धतीला लागलेली कीड आहे. ही कीड मारुन टाकण्यासाठी परीक्षेचे दहा मिनिटं कमी करणं म्हणजे आजारापेक्षा इलाज भयानक असल्याचं पालकांचं म्हणणं आहे.

मुंबईहून एम डी टी व्ही न्यूज ब्युरो…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here