मुंबई -५/५/२३
‘प्रत्येक पक्षाच्या अध्यक्षाला अधिकार असतो. तो निर्णय होऊ द्या.
मग मी बोलेल. महाविकास आघाडीला तडा जाईल, असे मला वाटत नाही.
प्रत्येकाला आत्मचरित्र लिहिण्याचा अधिकार आहे. प्रत्येक कुटुंबाला मी त्यांच्या कुटुंबाचा सदस्य वाटतो हे माझ्यासाठी खूप आहे, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच शरद पवार यांच्या निवृत्तीवर भाष्य केलं.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली.
कार्यकर्त्यांचा नेत्यावर अधिकार असतो. त्यांना सर्वांचा हिताचा निर्णय घेऊ द्या. मी त्यांना सल्ला कसा देणार आहे. सल्ला पचनी नाही पडला तर, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
तसंच, प्रत्येक पक्षाच्या अध्यक्षाला अधिकार असतो. तो निर्णय होऊ द्या. मग मी बोलेल. महाविकास आघाडीला तडा जाईल, असे मला वाटत नाही. प्रत्येकाला आत्मचरित्र लिहिण्याचा अधिकार आहे. प्रत्येक कुटुंबाला मी त्यांच्या कुटुंबाचा सदस्य वाटतो हे माझ्यासाठी खूप आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
मी मोदींचा नाही, व्यक्तीचा नाही तर वृत्तीचा पराभव करण्यासाठी एकत्र या बोललो. हुकूमशाही प्रवृत्तीचा पराभव करायचा आहे, अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी केली.
शिवसेनाप्रमुखांचा अधिकार काढून घेतला होता. मोदीजी म्हणाले बजरंग बली की जय म्हणून मतदान करा. कदाचित कायद्यात बदल झाला असेल. शिवसेनाप्रमुखांना निवडणूक लढण्यासाठी बंदी घातली होती. मग कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र तेथील लोकांवर भाषिक अत्याचार होतोय. म्हणून त्यांनी मराठी माणसाची एकजूट जपणाऱ्या उमेदवारांना छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलून मतदान करावे. मराठी माणसाची वज्रमुठ जपा. तेथील मतदारांनी ठरवायला हवे जय भवानी जय शिवाजी म्हणून मतदान करा, असं आवाहनही उद्धव ठाकरेंनी बेळगावमधील जनतेला केलं.
वज्रमुठ सभांचा कार्यक्रम मे अखेर किंवा जूनपर्यंत करायचा ठरवले होते. पण खारघर घटनेनंतर थोडा विचार बदलला. नंतर या सभांचे नियोजन केले जाईल, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
‘मी त्यांचा हिम्मत पाहायला तयार नाही. मी माझ्या लोकांना भेटायला जातोय. या प्रकल्पाबाबत विचित्र मते तयार आहे. रिफायनरीचे प्रदूषण मला परवडणारे नाही. आमचे सरकार पाडल्यानंतर राज्यात येणारे चांगले प्रकल्प गुजरातकडे वळवले. माझे पत्र नाचवता, पण माझ्या काळात येणारे प्रकल्प का वळवले, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
डोक्यावर बंदूक टेकवून तुम्ही प्रकल्प लादू नका. कुणाची बाजू घेऊन तुम्ही येताय. उपऱ्यांनी तेथील जमिनी घेतल्या आहेत. तुम्ही उपऱ्यांची सुपारी घेऊन माझ्या भूमिपुत्रांच्या अंगावर येत आहात, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी राणे कुटुंबावर निशाणा साधला.
तेजस पुराणिक ,एम डी टी व्ही न्यूज ,नाशिक/मुंबई ब्युरो