नंदुरबार :२१/३/२३
गेल्या आठ दिवसापासून शहादा तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपिटीचा तडाखा शेतकऱ्यांना बसला..
अवकाळी पावसाने शेतकऱ्याला हैराण करून सोडलं..
त्यात काही दिवसांपासून सुरू होतास सरकारी कर्मचाऱ्यांचा संप.
आता प्रतीक्षा आहे बळीराजाला नुकसान भरपाई मिळण्याची..
त्यासाठी पुढाकार घेतलाय महाविकास आघाडीने
सध्या अवकाळी पावसाचं थैमान आणि नुकताच सुरू होता तो सरकारी कर्मचाऱ्यांचा संप बळीराजा चांगलाच कोंडीत पकडला गेला होता..
हातातोंडाशी आलेल्या घास हिरावून गेल्याने शेतकऱ्याला जगायचं कसं हा प्रश्न उभा होता? शासनाने त्वरित पंचनामे करावेत..
नुकसान भरपाई अहवाल शासनाला लवकर सादर करावा आणि शेतकऱ्याच्या खात्यावर नुकसान भरपाई रक्कम जमा करावी अन्यथा हवालदील झालेल्या शेतकऱ्याला आत्महत्या शिवाय पर्याय नाही?
विदारक स्थिती सध्या अवकाळी पावसामुळे निर्माण झाल्याचे चित्र आहे..
म्हणतात ना गाजराची पुंगी वाजली तर वाजली असाच काहीसा प्रकार सरकारच्या बाबतीत दिसून येतो..
आश्वासन देऊन गाजर दाखवून शेतकऱ्यांना शांत केलं खरं परंतु प्रत्यक्षात भरपाई मिळेल तेव्हा खरं..
अडचणींचा डोंगर डोक्यावर उभा असून त्यातून जगण्यासाठी मार्ग कसा शोधायचा वाट कशी शोधायची हा गहन प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे..
चटणी भाकरीवर जगणारा हा बळीराजा कोणाकडून खूप अपेक्षा ठेवत नसतो.. पण त्याच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह चालवायचा कसा प्रश्न महाविकास आघाडीने निवेदनाच्या माध्यमातून सरकारला विचारलंय.
शहादा तहसीलदार यांना नुकताच याबाबत निवेदन सादर केलं..
शेतकऱ्यांना लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा ही मागणी या माध्यमातून करण्यात आली आहे…
यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी डॉक्टर सुरेश नाईक तालुका काँग्रेस अध्यक्ष, एडवोकेट अशोक पाटील जिल्हा किसन काँग्रेस अध्यक्ष, सुभाष पाटील सुरेंद्र कुवर तुळशीराम कोळी ,सुभाष नाईक यांच्यासह आघाडीचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते…
आता सरकारी कर्मचाऱ्यांचा संप जरी मिटला असला तरी सरकारने या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना जरा शेतकऱ्यांच्या बांधावर पाठवण्याचे कष्ट घ्यावेत आणि उद्ध्वस्त होऊ घातलेल्या शेतकऱ्यांचे जीवन पुन्हा उभं करावं ..
एका कवीच्या शब्दात हीच म्हणायची शेतकऱ्यांना वेळ येईल
” मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा,
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा,
पाठीवरती हात ठेवून तुम्ही फक्त लढ म्हणा.. फक्त लढ म्हणा..
शहाद्याहून या बातमीसाठी संजय मोहिते एम.डी.टी.व्ही न्यूज….