बी एड महाविद्यालयातील विद्यार्थी महेश पाटील ठरले सुवर्णपदकाचे मानकरी…

0
147

नंदुरबार-२१/२/२३

शॉर्ट हेडलाईन
1 जळगावात पार पडला कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठचा पदवी प्रदान सोहळा
2 बीएड अभ्यासक्रमात विद्यापीठात प्रथम क्रमांक येण्याचा मिळवला महेशने मान
3 महेश भास्कर पाटील आहे नंदुरबार बीएड कॉलेजचा विद्यार्थी..
4 ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि भारत सरकारचे विज्ञान तंत्रज्ञान सचिव डॉक्टर एस चंद्रशेखर यांच्या हस्ते झाला गौरव
5 एन टी.व्ही.एस चे चेअरमन चंद्रकांत रघुवंशी यांच्यासह प्राचार्य डॉक्टर एम एस रघुवंशी यांनी केलं महेशच अभिनंदन
… भावी शिक्षक होण्यासाठी विद्यार्थ्यांना घ्यावं लागतं बीएड अभ्यासक्रमाचे शिक्षण..

याच अभ्यासक्रमात शिकत असताना महाविद्यालयातून गिरवले जातात प्रशिक्षणाचे धडे..

त्यात अव्वल ठरला महेश भास्कर पाटील नंदुरबार बी एड कॉलेजचा विद्यार्थी…
नंदुरबार तालुका विधायक समितीचे शिक्षण शास्त्र महाविद्यालयाचा विद्यार्थी महेश भास्कर पाटील हा शैक्षणिक वर्ष 2021 -22 मध्ये नंदुरबार येथील बीएड महाविद्यालयात शिक्षण घेत होता.

या वर्षात घेण्यात आलेल्या परीक्षेत बीएड जनरल अभ्यासक्रमात संपूर्ण विद्यापीठ परिक्षेत्रातून प्रथम क्रमांक येण्याचा मान त्याने पटकावला.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावचा 31 वा दीक्षांत समारंभ निसर्गरम्य परिसरात जळगावात संपन्न झाला.

वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि भारत सरकारचे विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सचिव प्राध्यापक डॉक्टर एस चंद्रशेखर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते महेशचा सन्मान करण्यात आला.

सुवर्णपदक प्रदान करण्यात आलं. यावेळी व्यासपीठावर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे विद्यमान कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर माहेश्वरी, प्र कुलगुरू डॉक्टर एसटी इंगळे, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ विनोद पाटील, परीक्षा विभागाचे संचालक डॉ दीपक दलाल यांच्यासह विद्यापीठाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.

या यशानं विद्यापीठाच्या शैक्षणिक पटलावर नंदुरबार जिल्ह्याची मान उंचावण्याचं श्रेय महेशच्या प्रयत्नांना पराकाष्टेला जातं. अर्थातच त्यात आहे त्याच्या आई-वडिलांचे आशीर्वाद, शिक्षकांचे मार्गदर्शन व सहकार्य..

त्याच्या कुटुंबीयांचे आणि महाविद्यालयातील प्राध्यापकांचे विधायक समितीचे चेअरमन चंद्रकांत रघुवंशी, व्हॉइस चेअरमन मनोज रघुवंशी, संस्थेचे सर्व पदाधिकारी, नंदुरबार बीएड कॉलेजचे प्राचार्य आणि समन्वयक डॉक्टर मुकेश रघुवंशी, यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक प्राध्यापिका वृंद यांनी महेशच्या यशाबद्दल त्याचं कौतुक आणि अभिनंदन केलंय..

एम.डी.टी.व्ही न्यूज कडून महेशच्या पुढील प्रवासाला हार्दिक शुभेच्छा…
प्रवीण चव्हाण नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी एम.डी.टी.व्ही न्यूज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here