मुंबई : 30/5/23
नुकतीच आज 30 मे 2023 रोजी राज्य सरकारची मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.. बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते
या मंत्रिमंडळ बैठकीत विविध महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले..
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
- सिल्लोड तालुक्यातील मौजे कोट नांद्रा व डोईफोडा येथे शासकीय जागेवर मका संशोधन केंद्र स्थापन करण्यास राज्य सरकारची मान्यता
- संशोधन केंद्रासाठी 22.18 कोटी इतक्या खर्चास मान्यता
- केंद्रासाठी आवश्यक 21 पदे व बाह्य स्त्रोताद्वारे 18 पदे निर्माण करण्यात येणार
तर यासह महत्त्वाचा दुसरा निर्णय म्हणजे पर्यटन व्यवसायात महिलांना अधिक वाव देण्यासाठी आई या नावाने पर्यटन धोरण आखणार
ठळक मुद्दे - *महिलांना पर्यटन व्यवसायात वाव मिळावा आणि त्यांचे सक्षमीकरण व्हावे म्हणून आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत आई हे महिला केंद्रित पर्यटन धोरण राबवण्यास मान्यता
- *पर्यटन स्थळी महिला बाईक टॅक्सी सेवा सुरू करण्यास सुद्धा मंत्रिमंडळाची मान्यता
- धोरणात या पंचसूत्रीचा अवलंब
महिला उद्योजकता विकास, पायाभूत सुविधा, महिला पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य, आपल्या पर्यटकांसाठी कस्टमाईज उत्पादने, सवलती व प्रवास आणि पर्यटन विकास - प्रत्येक तालुक्यातील नोंदणीकृत महिलांच्या मालकीच्या व त्यांनी चालवल्या दहा पर्यटन व्यवसायांना पर्यटन व्यवसाय उभारणीसाठी सहाय्य करण्यात येणार
- आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त एक ते आठ मार्च या कालावधीत तसेच वर्षभरात एकूण 30 दिवस एमटीडीसीच्या सर्व रिसॉर्ट आणि युनिट्स मध्ये सर्व महिला पर्यटकांना ऑनलाइन बुकिंग मध्ये 50% सूट मिळणार
- हे धोरण राबवण्याकरता पर्यटन संचालनालयामध्ये महिला पर्यटन धोरण कक्ष नव्याने तयार करण्यात येणार
त्यामुळे महिला केंद्रित पर्यटन धोरण निश्चितच लाभदायी ठरेल..
एम डी टी व्ही न्यूज ब्युरो, मुंबई