‘शासन आपल्या दारी’ अभियान यशस्वी करा

0
284

आढावा बैठक : पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या सूचना

नंदुरबार :-  शासकीय योजना लोकाभिमुख करुन त्यांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ हे अभियान यशस्वी करण्यासाठी प्रत्येक विभागाने नियोजन करावे, अशा सूचना राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार जिल्हृयाचे पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी आज दिल्या आहेत.

‘शासन आपल्या दारी’ या अभिनव उपक्रमाची पूर्व तयारी आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील बिरसा मुंडा सभागृहात पालकमंत्री डॉ.गावित यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकीस जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ.हिना गावित, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक, जिल्हाधिकारी मनिषा खत्री, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपवनसरंक्षक कृष्णा भवर, जिल्हा पुरवठा अधिकारी गणेश मिसाळ, सहाय्यक जिल्हाधिकारी मंदार पत्की यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

ADVERTISEMENT

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!

कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.

SPONSORED CONTENT
🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

यावेळी पालकमंत्री डॉ. गावित म्हणाले की, ‘जत्रा शासकीय योजनांची, सर्व सामान्यांच्या विकासाची’ नाव बदलून आता ‘शासन आपल्या दारी ’ हे नाव देण्यात आले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून या अभियानाच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील ७५ हजार लाभार्थ्यांना थेट लाभ देण्याचे ध्येय आहे. या अभियानाचे समन्वय मुख्यमंत्री सचिवालयाच्या जनकल्याण कक्षामार्फत करण्यात येणार आहे. त्यामुळे ही उपक्रम जिल्ह्यात यशस्वीपणे राबविण्यासाठी प्रत्येक विभागाने आपल्या विभागामार्फत देण्यात येणाऱ्या विविध योजनांची यादी तयार करावी. या योजनांची माहिती, योजनेच्या लाभासाठी पात्रतेचे निकष, लाभार्थ्यांची माहिती सर्वसमान्य नागरीकांपर्यंत पोहचविणे, प्रस्तावित लाभार्थ्यांची यादी तयार करणे, त्यांच्याकडून अर्ज भरुन घेणे इत्यादी कार्यवाही ही १५ मे पूर्वी करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्यात.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

जत्रा शासकीय योजनांची उपक्रम जिल्हा व तालुकास्तरावर १५ जूनपूर्वी दोन दिवसांच्या कार्यक्रमाचे आयोजन करुन नागरीकांना योजनांचा थेट लाभ प्रदान करावयाच्या असल्याने सर्व विभागांनी त्यादृष्टिने परिपूर्ण नियोजन करुन हे अभियान यशस्वी करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. प्रास्ताविकात निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी या उपक्रमाची व प्रत्येक विभागाने करावयाच्या कार्यवाहीची सविस्तर माहिती दिली. बैठकीस सर्व तहसिलदार, मुख्याधिकारी उपस्थित होते.

एम.डी.टी.व्ही. न्युज नंदुरबार

RECOMMENDED FOR YOU

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here