MANIPUR INCIDENT FALLOUT:२६ जुलैला नंदूरबार जिल्हा बंद ! आदिवासी संघटनांचा एल्गार ..

0
699

जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना निवेदन

नंदुरबार -२५/७/२३

मणिपूर राज्यातील कांगपोकपी येथील २ आदिवासी महिलांनाविवस्त्र करत,त्यांचे लैंगिक शोषण करत एका जमावाने रस्त्यावरून धिंड काढली.त्या घटनेचा निषेध म्हणून नंदूरबार जिल्ह्य़ातील समस्त आदिवासी समुदायच्या वतीने दिनांक 24 जुलै 2023 रोजी मनिषा खत्री ,जिल्हाधिकारी नंदूरबार व पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांना निवेदन देण्यात आले.मणिपूर येथील आदिवासी समुहावर गेल्या 3 ते 4 महिन्यापासून सामाजिक, राजकीय व प्रशासकीय अत्याचार सुरू आहे.2 आदिवासी महिलांवर घोर अत्याचार केल्याचा विडीओ सोशल मिडीयावर वायरल झाला आहे.तो बघून देशातील संपूर्ण आदिवासी समुदाय त्या घटनेचा निषेध व्यक्त करत आहे.

1

WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईनकरा. https://bit.ly/3UoK7E0

हे हि वाचा : https://tinyurl.com/2uy69prr

TALODA : मणिपूर घटनेचे पडसाद : तळोद्यात विविध संघटनांनी काढला निषेध मोर्चा ..

सदर घटना अखंड मानवजातीला काळीमा फासणारी असून आदिवासींवर अत्याचार होण्याच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहे .. या देशात आदिवासींवर कुणी लघुशंका करतोय( मध्यप्रदेश) तर कुणी बुटद्वारे पाणी पाजतोय ( राजस्थान)तर कुणी हाॅटेल सिसाॅर्ट मध्ये आदिवासी विद्यार्थ्यांनींना नाच करायला लावतोय( महाराष्ट्र)अशा देशभरात अनेक घटना दिवसेंदिवस घडत आहेत. तसेच आदिवासींचे आरक्षण खोट्या आदिवासींच्या हडप करण्यात येत आहे.
मणिपूर मध्ये घडलेल्या अमानवीय दुष्कृत्य व अत्याचार याचा जाहीर निषेध म्हणून नंदूरबार जिल्ह्य़ातील समस्त आदिवासी समुदायाकडून दिनांक 26 जुलै 2023 बुधवार रोजी सकाळी 7 ते सायंकाळ 5 वाजेपर्यंत संपूर्ण नंदूरबार जिल्हा बंदची हाक,देण्यात आली आहे .या दिवशी अत्यावश्यक सेवा वगळून जिल्ह्य़ातील सर्व तालुके व बाजारपेठा बंद ठेवण्याचे आवाहन समस्त आदिवासी समुदायाकडून करण्यात आले आहे.
यावेळेस पत्रकार परिषदेत आदिवासी टायगर सेना, बिरसा फायटर्स,आदिवासी महासंघ,आदिवासी एकता परिषद, आदिवासी बचाव अभियान, अखिल भारतीय पावरा व बारेला समाज संघ,लढा शिक्षक संघटना इत्यादी विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व जिल्ह्य़ातील हजारों आदिवासी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
नारायण ढोडरे,प्रतिनिधी :- ग्रामीण,एम डी टी व्ही न्यूज , नंदुरबार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here