Maratha Reservation Latest News: मराठा आंदोलनाची तीव्रता, गृहमंत्र्यांच्या घरी थेट जाण्याचा मनोज जरांगे-पाटलांचा इशारा

0
140
manoj-jarange-patil's-warning-to-go-directly-to-home-minister's-house

Maratha Reservation Latest News – मराठा आरक्षणासाठी मुंबईत Mumbai करण्यात येणाऱ्या आंदोलनाचा मार्ग आंदोलनकर्ते मनोज जरांगे-पाटील  (Manoj Jarange Patil)  यांनी गुरूवारी ( २८ डिसेंबर )(maratha reservation latest news ) जाहीर केला. २० जानेवारी रोजी अंतरवाली सराटी येथून निघणारी पदयात्रा सहा जिल्ह्यांतून जाणार असून, यामध्ये हजारो मराठा बांधव सहभागी होणार आहेत.

‘एम.डी टीव्ही’ चं Telegram  Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

‘एम.डी टीव्ही’ चं Facebook  Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

या पदयात्रेसाठी मराठा बांधवांना झोपण्यासाठी आणि खाण्यापिण्याच्या वस्तू मुंबईला घेऊन जाव्या लागणार आहेत. यासाठी आंदोलनकर्ते पोलिसांना वाहने बाहेर काढण्यास सांगितले आहे.

manoj jarange patils warning to go directly to home ministers house

“पोलिसांनी मराठा आंदोलकांची वाहनं अडवली, तर देवेंद्र फडणवीसांच्या
(Devendra Fadnavis) नागपूर आणि मुंबईतील घरी जाऊन बसू,” असा इशारा मनोज जरांगे-पाटलांनी दिला आहे.

जरांगे-पाटलांनी पदयात्रेत येणाऱ्या प्रत्येक तुकडीच्या प्रमुखांनी आणि स्वयंसेवकांनी आपल्या तुकडीतील समाजबांधवांच्या जेवणाची सोय करायची आहे, असेही सांगितले आहे.(Maratha Reservation) यासाठी प्रत्येक वाहनात मीठ, मिरची, तेल, ५० किलो बाजरी पीठ, ५० किलो गव्हाचे पीठ, ५० किलो तांदूळ, डाळी, छोटी चूल, पाण्याचे ड्रम, टँकर बरोबर घ्यावे, असे त्यांनी सुचवले आहे.

या इशाऱ्यामुळे पोलिस प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे. पोलिस प्रशासन आंदोलनकर्ते आणि वाहने अडवण्याच्या प्रयत्नांवर कसे नियंत्रण ठेवते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, एम.डी.टीव्ही न्यूज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here