Maratha Reservation Latest News – मराठा आरक्षणासाठी मुंबईत Mumbai करण्यात येणाऱ्या आंदोलनाचा मार्ग आंदोलनकर्ते मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange Patil) यांनी गुरूवारी ( २८ डिसेंबर )(maratha reservation latest news ) जाहीर केला. २० जानेवारी रोजी अंतरवाली सराटी येथून निघणारी पदयात्रा सहा जिल्ह्यांतून जाणार असून, यामध्ये हजारो मराठा बांधव सहभागी होणार आहेत.
‘एम.डी टीव्ही’ चं Telegram Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
‘एम.डी टीव्ही’ चं Facebook Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
या पदयात्रेसाठी मराठा बांधवांना झोपण्यासाठी आणि खाण्यापिण्याच्या वस्तू मुंबईला घेऊन जाव्या लागणार आहेत. यासाठी आंदोलनकर्ते पोलिसांना वाहने बाहेर काढण्यास सांगितले आहे.

“पोलिसांनी मराठा आंदोलकांची वाहनं अडवली, तर देवेंद्र फडणवीसांच्या
(Devendra Fadnavis) नागपूर आणि मुंबईतील घरी जाऊन बसू,” असा इशारा मनोज जरांगे-पाटलांनी दिला आहे.
- Maharashtra Expressway – ‘समृद्धी’नंतर महाराष्ट्राला मिळणार ‘पुणे-बंगळूर’ ग्रीन फील्ड…!
- Shreyas Iyer ची प्रकृती चिंताजनक सिडनीतील रुग्णालयात ICU मध्ये उपचार सुरू..!
- देशाचे ५३ वे सरन्यायाधीश कोण ? CJI Gavai यांनी सुचवले मोठे नाव..
- बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी Maharashtra Schools चा मोठा निर्णय! एक्झाम फॉर्म भरण्यासाठी आता ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ
- सरकारी कार्यालयात ID Card नसेल, तर Government Employee च्या पगार कापणार? मोठा निर्णय
जरांगे-पाटलांनी पदयात्रेत येणाऱ्या प्रत्येक तुकडीच्या प्रमुखांनी आणि स्वयंसेवकांनी आपल्या तुकडीतील समाजबांधवांच्या जेवणाची सोय करायची आहे, असेही सांगितले आहे.(Maratha Reservation) यासाठी प्रत्येक वाहनात मीठ, मिरची, तेल, ५० किलो बाजरी पीठ, ५० किलो गव्हाचे पीठ, ५० किलो तांदूळ, डाळी, छोटी चूल, पाण्याचे ड्रम, टँकर बरोबर घ्यावे, असे त्यांनी सुचवले आहे.
या इशाऱ्यामुळे पोलिस प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे. पोलिस प्रशासन आंदोलनकर्ते आणि वाहने अडवण्याच्या प्रयत्नांवर कसे नियंत्रण ठेवते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
ब्युरो रिपोर्ट, एम.डी.टीव्ही न्यूज


