भारत देश हा परंपरेने कृर्षी प्रधान देश असुन देशाची अर्थव्यावस्था ही शेतमालावरील उत्पादनांवर अवलंबुन आहे. देशातील 70% लोकसंख्या ही शेती व्यावसायावर उपजीविका करते.शेतकरी हा दिवसरात्र मेहनत करुन जीवाचे रान करुन उत्पन्न घेत असतो.घरातील बायको- पोरांचे कपडे,घेतलेल्या कर्जाची परतफेड .असे अनेक सप्न उराशी बाडघुन काढलेले धान्य जवळील बाजार मार्केट मध्ये घेवुन येत असतो.परंतु स्थानिक व्यापा-याकडुन योग्य भाव न देता अव्वाच्या सव्वा भावाने वजन-मापात तफावत करत धान्य खरेदी केल जाते.असे कोवडीमोल भाव मीळाल्याने शेतकरी हा नैराशेत आत्महत्येसर्यायी होतो. अशीच काही तत्सम परिस्थिती
धडगांव तालुक्यातील गेल्या काही वर्षापासुन चालत आहे. तालुक्यातील कृर्षीउत्पन्न बाजार समितीच्या निवळणुका मोठ्या घवघवा करत पार पाडल्या जातात.परंतु अध्याप पर्यंत कोणत्याही प्रकारची सुव्यावस्था बाजार मार्केटमध्ये करण्यात आलेली नाही.सर्व समीत्या व त्यांचे काम फक्त निवडणुकी पर्यंतच कार्यरत असतात.सर्वसामान्य शेतक-यांसाठी कोणतेही ठोस पाउले उचलले जात नाही अध्यापपरर्यंत अधिकृत खरेदी केंद्र व लीलाव पध्दतीने शेतक-यांची विक्रीसाठी आणलेला माल खरेदी केला जात नाही परीणामी शेतक-यां अनधीकृत व्यापा-यांना धान्य विक्री करावे लागते स्थानिक व्यापा-यांकडुन फसवणुक घट-तुट, सुट-सांड वजनकाट्यातील हेराफेरी तसेच खरेदी केलेल्या मालाचा मोबदला हा शेतक-याला एकत्रीत न देता
महीन्यातुन हप्त्या-हप्त्या अदा केला जातो. अशाप्रकारे तालुक्याती असंख्य शेतक-यांची पीळवणुक होत असुन स्थिनीक प्रशासनाकडुन योग्य ती कार्यवाही करुन समस्त शेतक-यांनी न्याय मीळवुन ध्यावा. असे निवेदनाद्वारे महाराष्ट्र नवनिर्माण सेना धडगांव टिम कडुन मागणी करण्यात आले. यावेळी
दिपक पावरा, संतोष पावरा, प्रकाश पावरा, सागर पावरा,सुदाम पावरा,संजय पावरा,शिवाजी पावरा.प्रविण पावरा आदि उपस्थित होते
गोपाल पावरा धडगांव प्रतिनिधी