नंदुरबारात १७ रोजी सरकारी कर्मचाऱ्यांचा मोर्चा..

0
661

नंदुरबार : १६/३/२३

राज्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कर्मचारी जुनी पेन्शन या एकमेव मागणीसाठी दिनांक १४ मार्च पासून बेमुदत संपावर गेले आहेत.

All the government and semi-government employees of the state have gone on an indefinite strike since March 14 for the sole demand of old pension.

या राज्यव्यापी संपात नंदुरबार जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय कर्मचारी व विविध शिक्षक संघटना समन्वय समिती सहभागी झाल्या आहेत. जूनी पेन्शनच्या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचारी संघटनेतर्फे गुरुवार दि .१७ मार्च रोजी सकाळी ९ .३० वाजता भव्य मोर्चाचे आयोजन केलेले आहे.

Coordination committee of government, semi-government employees and various teachers’ organizations of Nandurbar district have participated in this statewide strike. The State Government Employees Association has organized a grand march on Thursday, March 17 at 9.30 am for the demand of old Pension.

सदर मोर्चा हा साक्रीनाका येथून सुरू होईल. शांततेच्या मार्गाने फक्त पेन्शन मागणीच्या घोषण देत मोर्चा जुने पोलीस कवायत मैदान ( नेहरु पुतळा ), गांधी पुतळा हाटदरवाजा, महाराष्ट्र व्यायाम शाळा, सोनार खुंट, जळका बाजार, नवापूर चौफुली यामार्गे जिल्हाधिकारी कार्यालयाल्यावर धडकेल.

The march will start from Sakrinaka. The march will pass through Old Police Drill Ground (Nehru Statue), Gandhi Statue Hatdarwaja, Maharashtra Exercise School, Sonar Khunt, Jalka Bazar, Nawapur Chauphuli and pass through the Collector’s Office, announcing the demand for pension only..

जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार या ठिकाणी मोर्चाचा समारोप करण्यात येईल.

The march will conclude at Collectorate Nandurbar.

सदर मोर्चात मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघाचे जिल्हाध्यक्ष डॉ.हेमंत देवकर, सुभाष महिरे यांच्यासह चतुर्थश्रेणी कर्मचारी संघाचे भरत शिंदे, जुनी पेन्शन संघटनेचे संदीप रायते यांनी केले आहे.

Dr. Hemant Devkar, District President of State Government Employees Central Union, Subhash Mahire along with Bharat Shinde of Class IV Employees Union, Sandeep Raite of old Pension Association have appealed to a large number of employees to participate in the said march..

जीवन पाटील ,कार्यकारी संपादक ,एम डी टी व्ही न्यूज नंदुरबार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here