जय अंबिका क्रेशर स्टोन वरील साहित्य गेले चोरी..

0
265

अक्कलकुवा : ०५/०३/२०२३

अक्कलकुवा तालुक्यातील गुलीअंबर शिवारातील जय अंबिका क्रेशर येथून डिझेल, गॅस सिलेंडर, तांब्याची पिन व कटर मशीन असे विविध साहित्य चोरण्यात आलं .

अज्ञात चोट्यांनी चोरून नेल्याची घटना गुलीअंबर येथे घडली.

याप्रकरणी अनोळखी चौघांविरुद्ध अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की अक्कलकुवा तालुक्यातील गुलीअंबर शिवारातील जय अंबिका स्टोन क्रेशरजवळून अज्ञात चोट्यांनी साहित्याची चोरी केली

यात 50 हजार रुपये किमतीचे पाचशे लिटर डिझेल, 3 हजार रुपये किमतीचे एक गॅस सिलेंडर, 4 हजार रुपये किमतीचे एक तांब्याची पिन, 1 हजार रुपये किमतीचे एक कटर मशीन असे साहित्य चोरीला गेले असल्याची माहिती आहे .

सदर याबाबत चेतन शिवदास चौधरी यांनी अक्कलकुवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे .

त्यानुसार चार अनोळखींविरुद्ध भादवी कलम 379 व 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

सदर पुढील तपास हेड कॉन्स्टेबल उल्हास इंगळे करीत आहे

सदर चोरी करताना चारही संशयित चोरांचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दृश्य कैद झाले आहे
शुभम भन्साली अक्कलकुवा प्रतिनिधी एम डी टी व्ही न्यूज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here