नुकसान भरपाई मिळण्याची केली मागणी,नुकसानग्रस्त बांधावरून एम डी टी व्हीचा ग्राउंड रिपोर्टींग
गोंडगाव /जळगांव -२१/४/२३
दिनांक 20 एप्रिल रोजी चार -साडेचार च्या सुमारास भडगाव परिसरासह गोडगाव येथे मोठ्या प्रमाणात वादळी वारा आणि जोरदार पाऊस झाला ..
त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला ..
आंबा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले..
राजेंद्र आनंदा पाटील गोंडगाव यांच्या शेतातील आंबा अर्धा ते पाऊण किलोचे फळ हे जमीनदोस्त झाले आहे
आंबा पिकाचे पूर्णतः कैऱ्या या जमिनीवर आल्याने शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
दिवसेंदिवस गावरान आंब्याचे उत्पादन कमी कमी होत असताना निसर्गाच्या लहरीपणामुळे शिल्लक उत्पन्न देखील शेतकऱ्याचे जमीनदोस्त झाले आहे .. यासंदर्भात पत्रकार सतीश पाटील यांनी तालुका कृषी अधिकारी गोरडे यांना नुकसान भरपाई ची माहिती दिली असता एकही लाभार्थी नुकसान भरपाई पासून वंचित राहणार नसल्याची ग्वाही भडगाव तालुका कृषी अधिकारी यांनी एम डी टी व्ही शी बोलतांना दिली आहे..
त्यामुळे आता बळीराजाला अपेक्षा आहे ती वेळेत पंचनामे होण्याची ..
त्वरित शासनाकडून योग्य ती नुकसान भरपाई मिळण्याची ..
देशाचा पोशिंदा जर जगला नाही तर सामान्यांचं जगणं काय ? शेतकऱ्यांच्या नजरा लागून आहे आता पंचनाम्यांकडे ..
आमचे प्रतिनिधी यांनी थेट शेतकऱ्याचा बांधावरून अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देऊन याचा पाठपुरावा केलाय .. सतीश पाटील सर आणि चॅनेलचं शेतकऱ्यांनी अभिनंदन केलंय ..
सतीश पाटील,भडगाव प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज,जळगांव ..