नंदुरबारात शिव चर्चा कार्यक्रमाची तयारी पूर्ण : दीड लाख भाविक येण्याची श्यक्यता

0
3424

कार्यक्रमाची तयारी पूर्ण ; छत्रपती मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलचे होणार उद्घाटन

नंदुरबार :- शहरातील उड्डाणपूल बायपास रस्त्यावरील छत्रपती मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलच्या उद्घाटनानिमित्त उद्या दिनांक २२ रोजी शिव महापुराण कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांच्या एक दिवसीय शिव चर्चा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून संपूर्ण तयारी पूर्णत्वास आलेली आहे. महाराष्ट्र,गुजरात व मध्य प्रदेशातून सुमारे दीड लाख लोकांची उपस्थिती लक्षात घेता मंडप उभारण्यात आला आहे. सकाळी १० वाजता शोभायात्रा, छत्रपती मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलचे उद्घाटन यानंतर शिव चर्चा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून कथा प्रवचनाला येतांना भाविक भक्तांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी. जे लोकं आजारी असतील त्यांनी घरी टीव्हीवर महाराजांची कथा श्रवण करावी, असे आवाहन माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केले आहे.

ADVERTISEMENT

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

शिवसेनेचे संपर्क प्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या संकल्पनेतून शहरालगत असलेल्या शहादा बायपास रस्त्यावर १२५ बेडचे छत्रपती मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल उभारण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन दिनांक २२ रोजी अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर शिव कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांच्या हस्ते करण्यात येत आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत.

SPONSORED CONTENT

🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!

कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.

🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दरम्यान, शिव महापुराण कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांच्या एक दिवसीय शिव चर्चा कार्यक्रमाचे दुपारी १ आयोजन करण्यात आले आहे.
तत्पूर्वी जी.टी पाटील महाविद्यालय परिसरापासून त्यांची सकाळी १० वाजता पंडित मिश्रा यांची शोभायात्रा निघणार आहे. मारुती व्यायाम शाळा, अंधारे चौक, आमदार कार्यालय, जुनी नगरपालिका चौक,स्टेशन रोड, नेहरू पुतळा मार्गे हाट दरवाजा व तेथून चंद्रकांत रघुवंशी यांच्या निवास्थानी राम पॅलेस येथे शोभायात्रेचा समारोप होईल.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शोभायात्रेत अग्रस्थानी कलशधारी युवती व महिला असतील. साधारणता हजारावर मुलांच्या सहभाग असणार आहे. श्री शिवाय नमस्तुभ्यम, हर हर महादेवाच्या जयघोषित ठीक ठिकाणी पं.मिश्रा यांचे स्वागत केले जाणार आहे.
बायपास रस्त्यावर छत्रपती मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलच्या प्रांगणात शिव चर्चा होणार आहे. कथा श्रवणासाठी शेजारील गुजरात, मध्यप्रदेश राज्यासह बाहेर गावातील शिवभक्त सायंकाळ पासूनच दाखल होण्याची शक्यता आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0


शिव कथेला पंडित प्रदीप मिश्रा यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कथेला उपस्थित राहणार असल्याने शहरात ठिकठिकाणी त्यांच्या स्वागताचे फलक झळकवण्यात आलेले आहेत.धुळ्याच्या चौफुली, नवापूर चौफुली, बायपास रस्ता, नेहरू पुतळा,स्टेशन रोड, अंधारे चौकसह ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत.

भाविकांनी काळजी घ्यावी; माजी आ.चंद्रकांत रघुवंशी

कथा प्रवचनाला येतांना भाविक भक्तांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी. जे लोकं आजारी असतील त्यांनी घरी टीव्हीवर महाराजांची कथा श्रवण करावी. महिला भाविकांनी आपल्या सुरक्षिततेसाठी महागडे दाग दागिने विधान करून येऊ नये.येतांना सोबत पाण्याची बाटली, ऊन लागू नये म्हणून टोपी अथवा रुमाल सोबत असू द्यावा. असे कथा आयोजक माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले.


एम.डी.टी.व्ही. न्यूज ब्युरो नंदुरबार.

RECOMMENDED FOR YOU

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here