अकोला – अकोट येथील सहकारी सूतगिरणी कामगारांचे गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेले उपोषण अखेर मागे घेण्यात आले.
अकोट सूतगिरणी ही कवळी मोल भावाने काही महिन्यात अगोदर विकली त्यामध्ये सूतगिरणी कामगाराचे पैसे त्यांना देण्यात आले नाही. त्यामुळे कामगार संघटना ही तहसील कार्यालय अकोट येथे गेल्या सात दिवसापासून उपोषणाला बसली होती त्याचा उपोषनाला शासनाने कसलाही प्रतिसाद दिला नाही.
त्यामुळे सातव्या दिवशी लोकप्रतिनिधी मा. आमदार प्रकाश पाटील भारसाकळे यांनी उपोषण स्थळी भेट देऊन कामगार संघटनेचे प्रश्न समजावून त्या कार्यलया संबंधी वरिष्ठ अधिकारी यांच्याशी संपर्क करून सदर कामगारांची बाजू घेऊन अधिकारी वर्गाला धारेवर धरले.
या प्रकरणात अधिकारी वर्गाने मोठा गैरवापर करून संबंधी सुतगिराणीची खरेदी झाली नसताना सुद्धा 500 रुपयेच्या स्टँपवर त्याची नोंद ही कायाद्याबाहेरील आहे, असा सर्व प्रकार अधिकारी वर्गाने करून कामगारांवर अन्याय केले आहे. मा.आमदार प्रकाश पाटील भारसाकळे यांना या प्रकरनामध्ये कामगाराची बाजू घेऊन अधिकारी वर्गकडून सदर प्रकरणाला स्थगिती घेऊन सदर व्यवहार रद्द करण्यासंबंधी सूचना देऊन सर्व कामगार व महिला कामगार यांचे उपोषण सोडून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला.
अशोक भाकरे, एम.डी.टी.व्ही.न्युज अकोला