पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित : सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगासाठी निधी देणार..

0
143

नंदुरबार -२२/४/२३

शेतकरी, नवउद्योजक, महिला बचत गट, शेती उत्पादक संस्थांना अन्न प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी निधी उपलब्ध करुन देणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी केले.

शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळामार्फत काल कर्ज वितरण सोहळा कार्यक्रम पालकमंत्री डॉ.गावित यांच्या हस्ते संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते. 
यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हिना गावित, नाशिक आदिवासी विकास महामंडळांचे संचालक मगन वळवी, आदिवासी विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक नरेंद्र रनमाळे, उपप्रादेशिक व्यवस्थापक शुभांगी शिरसाठ, प्रतिभा पवार, एकलव्य रेसिडेन्सी स्कुलचे प्राचार्य विलास केंदळे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी डॉ.गावित म्हणाले की, शेतकरी, नवउद्योजक, महिला बचत गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांना कांदा, आमसुल, केळी, पपई, सिताफळ, स्ट्रॉबेरी, काजू व भाजीपाला पिकांवर प्रक्रिया उद्योग व कंपन्या स्थांपन करण्यासाठी लाभार्थ्यांना मोफत प्रशिक्षण उपलब्ध करुन देण्याबरोबरच त्यांना व्यवसाय उभारण्यासाठी कर्ज / निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी जेवढ्या गतीने आपण अर्ज कराल तेवढ्या गतीने त्यांना मंजुरी देण्यात

येईल. जेणे करुन जिल्ह्यातील शेतकरी, बेरोजगार, बचत गटाना याचा मोठ्या प्रमाणावर लाभ होईल.

देशात एकमेव असे आदिवासी विकास खाते आहे ते आदिवासी समाजाला पाहिजे त्या योजनांचा लाभ देते परंतू या संधीचा लाभ लाभार्थी घेत नाही.

त्यामुळे जास्तीत जास्त लाभार्थ्यांना या संधीचा फायदा घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा.

https://bit.ly/3UoK7E0

मागील काळात आदिवासी विकास खात्याचा मंत्री असतांना मोठया प्रमाणात लाभार्थ्यांना गाय, बकरी, म्हैस, डिझेल पंप, बोअरवेल, पीव्हीसी पाईप, तसेच वाहने वाटप केली होती. त्याच प्रमाणे आताही ते वाटप करणार असून आजच 27 प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली असून 10 प्रकल्प नंदुरबार जिल्ह्यातील असल्याचे त्यांनी सांगितले.

ज्या गरीब व्यक्तींना घरे नाही अशांना आदिवासी विकास विभागामार्फत मोठया प्रमाणात घरकुलाचे काम घेण्यात येत असून ज्या व्यक्तींचे ‘ड’ यादीत नाव सर्व आदिवासी बांधवांना 100 टक्के घरे देण्यात येईल.

येत्या दोन वर्षांत राज्यातील गरीब लोकांना ज्यांच्याकडे घरे नाहीत अशा सर्वांना 100 टक्के घरकुल देणार आहे.

प्रवीण चव्हाण ,प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज ,नंदुरबार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here