अक्कलकुवा तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

0
241

नंदुरबार : अक्कलकुवा तालुक्यातील वडफळी येथील नदी किनाऱ्यावर अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी तिघा संशयितांविरोधात मोलगी पोलीस ठाण्यात पोस्को कायद्यांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्कलकुवा तालुक्यातील वडफळी येथील नदीकिनाऱ्यावर दि.१९ एप्रिल रोजी रात्री ११.३० ते १२ वाजेच्या सुमारास मोलगीचा सोराचापडा येथील तिघांनी संगनमत करुन एका १४ वर्षीय मुलीला जबरदस्तीने नेऊन तिच्यावर अत्याचार केला. सदर घटना कोणाला सांगितली तर जिवेठार मारण्याची धमकी दिली होती.

ADVERTISEMENT

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!

कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.

SPONSORED CONTENT
🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

याप्रकरणी पिडीत मुलीने तिच्या कुटूंबियांना या प्रकाराबाबत सांगितल्यानंतर मुलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तिघा संशयितांविरोधात मोलगी पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३६३, ३७६ (२), (जे), (एन), ३७६ (अ), ५०६, ३४ सह पोस्को कायदा २०१२ चे कलम ३, ४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, घटनास्थळी अक्कलकुवा उपविभागीय पोलिस अधिकारी संभाजी सावंत, मोलगी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक धनराज निळे यांनी भेट दिली आहे. तिघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक धनराज निळे करीत आहेत.

एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो, नंदुरबार.

RECOMMENDED FOR YOU

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here