सन. २०२१-२२ शिष्यवृत्ती योजनेत २ लाख ८६ हजाराची अनियमितता
संबंधित मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल करण्याचा जि.प. सीईओंचा इशारा
नंदुरबार – सुवर्ण महोत्सवी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजनेंतर्गत मंजूर रक्कम विद्यार्थ्यांना वितरीत करण्यासाठी संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांच्या खात्यावर निधी वर्ग करण्यात आला होता. मात्र या निधीचा जि.प.शाळा जावदे येथील प्रभारी मुख्याध्यापक यांनी गैरव्यवहार केल्याचे दिसून आले असून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावंडे यांनी दिला आहे या शाळेत सन २०२१-२०२२ या शैक्षणिक वर्षात दोन लाख ८६ हजार रक्कमेची अनियमितता आढळून आली आहे.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
सन २०२१-२०२२ या शैक्षणिक वर्षातील सुवर्ण महोत्सवी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना अंतर्गत मंजूर रक्कम विद्यार्थ्यांना वितरीत करण्यासाठी संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांच्या खात्यावर झेड.पी.एफ.एम.एस ऑनलाईन मंजूर निधी वर्ग करण्यात आलेला आहे. सदर निधी शाळेतील इयत्ता निहाय वरील या शैक्षणिक वर्षातील सुवर्ण महोत्सवी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना अंतर्गत मंजूर रक्कम विद्यार्थ्यांना वितरीत करण्यासाठी संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांच्या खात्यावर निधी वर्ग करण्यात आला होता. मात्र जावडे जि.प.शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक यांच्यावर दोन लाख ८६ हजार रक्कमेची अनियमितता केल्याचे चौकशीत आढळून आले असून त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. लवकर संबंधित मुख्याध्यापकावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा सीईओ गावडे यांनी दिला आहे .
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
जिल्हयातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुख्याध्यापकांनी अदयाप सुवर्ण महोत्सवी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना अंतर्गत मंजुर रक्कम विद्यार्थ्यांच्या अथवा पालकांच्या खात्यावर रक्कम वर्ग केली नसल्यास किंवा सदर योजनेच्या रक्कमेसह इतर योजनांची रक्कम रोखीने काढुन अपहार केल्याचे निर्देशनास आल्यास तात्काळ मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांच्या कडे तक्रार सादर करावी, असे आवाहन रघुनाथ गावडे यांनी केले आहे.
एम.डी.टी.व्ही. न्युज… नंदुरबार