हिरकणी कक्षाच्या दूरवस्थेमुळे आमदार सरोज अहिरे भावनिक..

0
219

मुंबई /नाशिक :२८/०२/२०२३

मुंबईत अधिवेशनासाठी आलेल्या सरोज अहिरे यांच्या डोळ्यात पाणी आले.

आपल्याला बाळासह राहण्यासाठी कोणतीही व्यवस्था न करण्यात आल्यामुळे त्यांच्या डोळ्यात पाणी आलं.

त्यांना अश्रू अनावर झाले ..

mumbai saroj ahire 1 1
या आहेत नाशिकच्या देवळालीच्या आमदार राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे

नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये आपल्या बाळासह हजर राहणाऱ्या राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे यांचं नाव चर्चेत आलं होतं.

खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यांचं कौतुक केलं होतं.

आपल्या अडीच महिन्याच्या लेकीसह राष्ट्रवादीच्या आमदार नागपूर अधिवेशनात हजेरी लावली होती.

आमदार अहिरे आपल्या बाळाला घेऊन अधिवेशनाला आल्यामुळे सर्वच आमदारांनी त्यांचं कौतुक केलं होतं.

त्यावेळी हिरकणी कक्ष स्थापन केला जाईल, असं आश्वासनच मुख्यमंत्री शिंदेंनी दिलं होतं.

पण, आज मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी त्या आपल्या लेकीसह आल्यात. पण त्यांना धक्काच बसला..

पहा सर्वप्रथम या कक्षाची दुरवस्था ..

हिरकणी कक्षाच्या बोर्ड व्यतिरिक्त तिथे काहीही नव्हतं.

या महिला आमदारांच्या डोळ्यातून झाले अश्रू अनावर ..

कक्षामध्ये बाथरूमची व्यवस्था नव्हती.

सगळीकडे धूळ पसरलेली होती. अशा कक्षामध्ये बाळाला कसं घेऊन बसणार, असं म्हणत अहिरे यांनी नाराजी बोलून दाखवली.

एवढंच नाहीतर सार्वजनिक शौचालयात जाऊन त्यांनी हात धुतले आणि त्यानंतर बाळाला घेतलं.त्या काय म्हणालात नेमकं ऐकू या …

मी जनतेचे प्रश्न सोडण्यासाठी इथं आले होते.

8 दिवसांआधीच प्रधान सचिवांना भेटले. आज मी इथं आले होते, परंतु, हिरकणी कक्षाची फक्त पाटी आहे.

मला महिनाभर सभागृहात हजर राहणार असेल तर कक्षामध्ये जागा द्यावी अशी विनंती केली.

मी एकही दिवस सभागृह बुडवलं नाही.

मी आहे त्या परिस्थितीत काम केलं.

गरोदर असतानासुद्धा आली होती.

एक आई म्हणून माझं बाळ सुरक्षित राहावं अशी अपेक्षा होती.

पण हॉलमध्ये धूळ होती, अशा वातावरणात आजारी बाळाला ठेवू शकत नाही. असं म्हणत अहिरे आपल्या बाळाला विधिमंडळातून घेऊन गेल्या..

जर माझी अशी अवस्था असेल तर राज्यातील महिलांसाठी काय मागणी करू.. तुमचं हिरकणी कक्ष तुम्हाला लखलाभ असो, अशी नाराजीही त्यांनी व्यक्त केली.
नाशिकहून तेजस पुराणिक जिल्हा प्रतिनिधीसह ब्युरो रिपोर्ट एम डी टी व्ही न्यूज मुंबई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here