निवृत्ती नंतरही समाजात सक्रीय राहणे गरजेचे- आमदार सत्यजीत तांबे

0
216

नंदुरबार :- कोणत्याही क्षेत्रात काम करत असताना एका ठराविक कालमर्यादेनंतर प्रत्येकाला आरामाची गरज असते. आपल्याला मिळालेल्या संधीचं आपण नक्कीच सोनं केलं आहे. सेवानिवृत्त जरी आपण झाले असाल तरी शिक्षक हा कधीच निवृत्त होत नसतो. शिक्षक म्हणूनच नाही तर इतर कोणत्याही क्षेत्रात काम करून आपण समाजात सक्रीय रहायला हवे. सेवानिवृत्ती नंतरही समाजात सक्रीय राहणे हेच आयुष्याचं खरे यमक आहे, असे प्रतिपादन आमदार सत्यजीत तांबे यांनी केले.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

आमदार सत्यजित तांबे काल शहादा येथील म्युनिसिपल हायस्कूलच्या शिक्षकांच्या निवृत्तीच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. शिक्षण क्षेत्रात शिक्षकांना उद्भवणाऱ्या समस्या, शिक्षण संघटनांनी लोकांना समजावून सांगायला हवे. मोठ्या प्रमाणावर त्यांचा पाठींबा मिळवून घेण्यासाठी प्रयत्न करायला हवे, तेव्हाच एक दबाव निर्माण होऊन शासन आपल्या प्रलंबित प्रश्नांवर निर्णय घेईल असा सल्ला आमदार सत्यजीत तांबे यांनी उपस्थित शिक्षकांना दिला.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

शिक्षकांना शिक्षण विभागाशी निगडित आपल्या वैयक्तिक कामांसाठी आणि संस्थेच्या कामांसाठीही वारंवार सरकारच्या विविध कार्यालयांमध्ये फेऱ्या माराव्या लागतात. अनेकदा पाठपुराव्यासाठीही जावे लागते. या सगळ्यात शिक्षकांच्या वेळेचा मोठा अपव्यय होतो आणि परिणामी विद्यार्थ्यांचेही नुकसान होते. त्यासाठी पर्यायी व्यवस्था किंवा संगणकीय प्रणालीद्वारे उपाययोजना करण्याचे काम सुरु असून शिक्षकांना कामांसाठी सरकार दरबारी खेटे घालायची गरज पडणार नाही अशी माहिती आमदार सत्यजीत तांबे यांनी यावेळी दिली.

एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो, नंदुरबार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here