नंदुरबार :२०/३/२३
17 मार्च रोजी नंदुरबार तालुक्याच्या पश्चिम टप्प्यात पावसाने चांगलं झोडपलं..
त्यात आष्टी परिसरातील शेतीचं मोठं नुकसान झालं..
विविध पिकांचं नुकसान झालं..
नवापूर विधानसभेचे आमदार शिरीष नाईक यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली..
नंदुरबार तालुक्यातील पश्चिम टप्यात आष्टे गटात दि, १७/०३/२०२३ रोजी वादळीवारासह विजांच्या कडकडाटासह सह जोरदार पाऊस व गारपिट झाला .. आष्टे, वाघाळे, ठाणेपाडा,घोगळगाव,अंबापुर, सुतारे,हरिपुरसह शेजारील गावांना ह्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाल..
त्या भागाचा नुकसानीचा प्रत्यक्ष बांधावर जावुन आ.शिरिषकुमार नाईक यांनी पाहणी केली..
व शेतकर्याशी चर्चा केली.
ह्या नैसर्गिक आपत्ती मुळे, विशेषतः कांदा, गहु, हरबरा, टरबूज,मका टमाटे हरभरा व ई.पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं ..
या पावसामुळे महसूल व क्रुषी विभागाने झालेल्या नुकसानीचा योग्य तो पंचनामा त्वरित करावा म्हणून आपण.क्रुषी मंत्र्यांशी चर्चा करून नवापूर विधानसभा मतदार संघातील व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य ती भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं म्हंटलं .. …सद्या महाराष्ट्र राज्य अधिकारी कर्मचारीवर्ग संपावर असुन ह्या संकट समयी तात्काळ शेतकऱ्यांना योग्य ते सहकार्य करावे असे आ.शिरिषकुमार नाईक आवाहन केलं .. …
यावेळी रतिलाल कोकणी मा.सभापती पंचायत समिती नवापूर कमलेश महाले सदस्य पंचायत समिती नंदुरबार. नरेंद्र नगराळे नगरसेवक(विरोधी पक्षनेते)नवापूर, राजेंद्र गांगुर्डे सरपंच घोगळगाव, सुरेश भोये सरपंच हरिपुर, भरत बागुल.संजय चौरे,दिलिप पवार,सरपंच सुतारे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते….
नारायण ढोडरे,प्रतिनिधी :- ग्रामीण नंदुरबार, एम डी टी व्ही न्यूज..