2000 Rupee Note change : 2 हजारांची नोट बदलायला जाण्याआधी तुमच्या फायद्याच्या 5 गोष्टी..

0
274

मुंबई -२३/५/२३

2 हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा RBIकडून करण्यात आली आहे.
ही तसं पाहायला गेलं तर नोटबंदी नसली तरी यामुळे अनेक व्यवसायिक आणि लोकांना धक्का बसला आहे.
नोट बदलण्यासाठी सप्टेंबरपर्यंतचा अवधी देण्यात आला आहे. त्यानंतर मात्र तुम्हाला या नोट बदलता येणार नाही.

तुम्ही बँकेत जर नोट बदलण्यासाठी जात असाल तर तुम्हाला 5 गोष्टी माहिती असायला हव्यात.
ज्यामुळे तुमचं नुकसान टळेल आणि फायदा होईल. बँकेत जाण्याआधी कोणत्या 5 गोष्टी आहेत समजून घेऊया.
2 हजार रुपयांची नोट बदलण्यासाठी तुम्हाला पॅनकार्ड द्यावं लागणार आहे.
मात्र ही अट सगळ्यांना लागू होणार नाही. ज्यांना 20 हजार रुपयांच्या वर पैसे एक्सचेंज करायचे आहेत त्यांच्यासाठी ही अट असणार आहे. 20 हजार रुपयांपेक्षा कमी पैसे बदलून घेणाऱ्यांना बँकेतून थेट पैसे बदलून मिळणार आहेत.
बँके व्यतिरिक्त पोस्ट ऑफिस आणि मोबाईल व्हॅन 2 हजार रुपयांच्या नोटा बदलून देण्यासाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
त्यामुळे तुम्हाला बँकेतच जाण्याची गरज नाही.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
याशिवाय काही दुकानांमध्ये देखील नोट बदलून देण्याची सुविधा नागरिकांना उपलब्ध होऊ शकते.
फक्त तुमची फसवणूक होणार नाही याची काळजी घ्या.
रिझर्व बँकेनं 2 हजाराची नोट चलनातून मागे घेतली असली तरी हा निर्णय म्हणजे नोटबंदी अजिबात नाही, 30 सप्टेंबर नंतरही 2 हजाराची नोट बँकांमधे जमा करता येणार असून त्यापुढेही ही नोट बाळगणं अजिबात गुन्हा असणार नाहीये.

राज्य शिखर बँकेचे अध्यक्ष तथा बँकिंग फेडरेशनचे अध्यक्ष विद्याधर अनासर यांनीच हा महत्वाचा खुलासा केला आहे. त्यामुळे कुणीही घाई गडबडीने नोट बदलण्यासाठी कमिशन देण्याच्या फंदात पडू नये, असा सल्लाही अनासकर यांनी दिला आहे.

एम डी टी व्ही न्यूज ब्युरो .. मुंबई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here