धुळे -२२/४/२३
शिंदखेडा तालुक्यातील वरूळ गावाचे भूमिपुत्र हर्षल संजय मराठे गेल्या तीन महिन्यांपूर्वी अग्निविरच्या प्रशिक्षणासाठी नाशिकच्या देवळाली कॅम्प मध्ये कार्यरत होते..
काल प्रशिक्षण सुरू असताना अचानक त्यांच्या छातीत दुखू लागलं..
आणि दुःखदायक बाब म्हणजे हृदयविकाराचा झटका आल्यानं ते जागीच मरण पावले..
यामुळे धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील वरुळ गावावर एकच शोक कळा पसरली..
वाऱ्यासारखी ही वार्ता गावात पसरताच गावावर दुःखाचा डोंगर कोसळला..
त्यांचे पार्थिव गावात दाखल होताच त्यांची पार्थिवाची मिरवणूक काढून त्यांच्या मोठ्या भावाने त्यांना अग्निडाग देत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले..
नाशिकच्या देवळाली कॅम्प येथे भारतीय सेनादलाच्या चार वर्ष कालावधीच्या अग्नी वीर प्रशिक्षणासाठी एक जानेवारी 2023 पासून हर्षल रुजू झाला होता..
पण काळाला आणि नियतीला काहीतरी वेगळच हवं होतं आणि तेच घडलं..
त्याच्या आयुष्याचा धागा अर्ध्यावरच तुटला आणि सारी स्वप्नच विरली…
देश सेवेसाठी लढणाऱ्या वीर जवानांवर आज काळाने घाला घातला आणि धुळे जिल्ह्यासह शिंदखेडा तालुक्यातील वरुळ गावावर दुःखाचे सावट पसरलं..
कुटुंब आणि त्याच्या घरच्यांनी एकच टाहो फोडला..
एकीकडे अभिमानाने सांगणाऱ्या मातेला दुःखांन अश्रू अनावर झाल्याचं पहावयास मिळालं ..
या घटनेने संपूर्ण गाव सुन्न झाल होतं..
कुटुंबातील करता आणि करविता आपल्यातून गेल्याचं दुःख कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर दिसत होतं..
शिंदखेडा पोलिसांच्या वतीने त्याच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आलं..
पोलीस निरीक्षक सुनील भाबड यांच्यासह समस्त पोलीस कर्मचारी तहसील चे नायब तहसीलदार बन्सीलाल वाडीले, धुळे जिल्हा सैनिक कल्याण संघाचे रामदास पाटील, नाशिक देवळाली कॅम्प चे लष्कर जवान उपस्थित होते..
धुळे जिल्ह्यातील आजी आणि माजी सर्व सैनिक सहभागी झाले होते..
भारत माता की जय चा जयघोष करत शहीद हर्षल मराठे अमर रहे च्या घोषणा दिल्या जात होत्या..
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा.
https://bit.ly/3UoK7E0
एकूणच या गावात शोकमय वातावरण पसरल्यानं वरूळ भूमिपुत्राला आपण गमावल्याचे दुःख सर्वांच्या चेहऱ्यावर आणि त्यांच्या भावनेतून व्यक्त होत होतं.. आज अक्षय तृतीया आणि अक्षय तृतीया म्हणजे साडेतीन मूर्तांपैकी एक असं मानलं जातं परंतु या प्रसंग घडल्याने संपूर्ण गावात एकही चूल देखील पेटवली नसल्याने आजचा हा दिवस सर्वांच्या आठवणीत राहील अशा प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांमधून व्यक्त केल्या जात होत्या..
शहीद आणि वीर भूमिपुत्र हर्षलच्या कुटुंबियांच्या दुःखात एम डी टी व्ही न्यूज परिवार देखील सहभागी आहे..
त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना..
यादवराव सावंत ,प्रतिनिधी, शिंदखेडा, एम डी टी व्ही न्यूज..