सत्कर्म आणि दान करा,आयुष्य खऱ्या अर्थी सार्थकी लागेल : पंडित प्रदीप मिश्रा

0
1112

नंदुरबार येथे एकदिवसीय शिवचर्चा .. तर छत्रपती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे शानदार उद्घाटन संपन्न ..

नंदुरबार -२३/४/२०२३

ADVERTISEMENT

अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेलं सत्कर्म, दानाने पुण्य लाभत असतं.

सत्कर्म करणारे पुढे जात असतील तर तुम्ही देखील त्याच्या मागे पावलावर पाऊल ठेवा म्हणजे तुम्हाला देखील त्याचे पुण्य लाभ होईल त्यामुळे नेहमी सत्कर्म करण्याच्या नेहमी प्रयत्न करा असा सल्ला शिवमहापुराण कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांनी शिवभक्तांना दिला.

SPONSORED CONTENT
7 3
1

शहरालगत असलेल्या शहादा बायपास रस्त्यावर २५ कोटी खर्चाचे १२५ बेडचे उद्घाटन आज अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर पंडित प्रदीप मिश्रा यांच्या हस्ते करण्यात आले.. त्यानंतर हॉस्पिटलच्या प्रांगणात झालेल्या त्यांचा संगीतमय शिव चर्चेचे निरूपण त्यांनी केले.

कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून रोहयो मंत्री संदिपान भुमरे उपस्थित होते.

14 1
2
सौजन्य -स्वामी डिजिटल स्टुडिओ ,नंदुरबार ..

माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि माजी नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी यांनी पंडित प्रदीप मिश्रा यांचा जाहीर सत्कार केला ..

11 2
3

कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केले.यावेळी माजी ॲडिशनल सॉलिसिटर राजेंद्र रघुवंशी,अनिता रघुवंशी, माजी नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी, डॉ. मनोहरसिंग रघुवंशी,अर्चना रघुवंशी, उद्योजक मनोज रघुवंशी, इंदिरा महिला सहकारी बँकेच्या चेअरमन कविता रघुवंशी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी,मेघा रघुवंशी, छत्रपती हॉस्पिटलचे प्रमुख डॉ.तुषार रघुवंशी,शिल्पा रघुवंशी, साहिल प्रधान,अमृता प्रधान, विवेक प्रधान, कंचन प्रधान, कल्याणी रघुवंशी, अजय रघुवंशी,माजी नगरसेवक किरण रघुवंशी,राधिका रघुवंशी,माजी नगरसेवक यशवर्धन रघुवंशी कल्याणी रघुवंशी,पृथ्वी रघुवंशी, थिया रघुवंशी आदी उपस्थित होते.

🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!

कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.

🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
1 8
4
4 8
5

कथेचे निरूपण करतांना पंडित प्रदीप मिश्रा म्हणाले,देवराज पुण्यात्री नव्हता परंतु, त्याची माता शिवलिंगावर पाणी अर्पण करत होती.

त्यामुळे त्याचे पुण्य त्याला मिळालं होत. ज्याचा पैसा सत मार्गावर जात नाही तो पैसा दारू, अनैतिक मार्गाकडे वळायला सुरुवात करतो.पुराणातील चंचुली देवीचा दाखला देत पंडित प्रदीप मिश्रा यांनी सांगितले की, मौन धारण करणे एक आभूषण असून, चंचु देवी नेहमी मौनात राहायची त्यावेळेस माता पार्वतीने तिला सांगितले तू, कैलासावर राहते.

या ठिकाणी नामस्मरण करायला पाहिजे. तुझ्या मौनाचे कारण विचारले असता चंचूला देवी म्हणाली माझा पती प्रेत योनीत गेला आहे.

त्याला मुक्ती नाहीय मिळत आहे. त्यावर पार्वती माता ने शिव भक्ती करणाऱ्या तुमरूका कडे जाण्याच्या सल्ला दिला त्यानंतर चंचुला देवीचा पतीला मोक्ष मिळाला

5 6
6

शिवधाम उद्यान साकारणार

यावेळी माजी आमदार चंद्रकांत म्हणाले,शहरातील स्वामी समर्थ मंदिराच्या बाजूला असलेल्या जागेत शिवधाम उद्यानाची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यासाठीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निधीची मागणी केली असता त्यांनी याकामासाठी १ कोटी मंजूर केल्याचे त्यांनी सांगितले.

8 4
7

न भूतो,न भविष्यती: नंदनगरी झाली शिवमय –
हर हर महादेवाचा जयघोष,पं.प्रदीप मिश्रांची शोभायात्रा
–

हर-हर महादेव, श्री शिवाय नमोस्तुभ्यमच्या जयघोषात शिव पुराण कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांची शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेमुळे अवघी नंदनगरी शिवमय झाली होती.

2 8
8
3 8
9

नंदुरबार शहरालगत असलेल्या रघुवंशी कुटुंबियांच्या छत्रपती मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी शिव महापुराण कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांची सकाळी ११.३० वाजता जी.टी पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणात हेलिकॉप्टरने आगमन झाले.या ठिकाणी शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, उद्योजक मनोज रघुवंशी, शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी, माजी नगरसेवक किरण रघुवंशी, माजी नगरसेवक यशवर्धन रघुवंशी यांनी त्यांचे स्वागत केले.

१२ वाजेच्या सुमारास जी.टी पाटील महाविद्यालयाच्या आवारातून शोभायात्रेला प्रारंभ झाला. शोभा यात्रेच्या अग्रभागी कलशधारी युवती व महिलांच्या मोठ्या प्रमाणावर सहभाग होता.श्री शिवाय नमस्तभ्यम व हर हर महादेवाच्या जयघोष करीत शोभाभायात्रेत पारंपारिक वाद्यांच्या गजरात युवक युवतींना आबाल वृद्धांनी सहभाग नोंदवित जल्लोष केला.

6 5
10
12 2
11

ठिक-ठिकाणी पुष्पवृष्टी–

जी.टी पाटील महाविद्यालयातून शोभायात्रा पूजा ट्रेडर्स,मारुती व्यायाम शाळा,अंधारे चौक,आमदार कार्यालय,जुनी पालिका चौक,स्टेशन रोड,नेहरू पुतळा मार्गे महात्मा गांधी चौक येथून माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे राम पॅलेस निवासस्थानापर्यंत शोभायात्रा काढण्यात आली. शोभा यात्रेत पंडित प्रदीप मिश्रा यांचे ठिकाणी पुष्पृष्टी करून शिवभक्तांनी स्वागत केले.

9 2
12
13 1
13

चौका-चौकात नागरिकांची दुतर्फा गर्दी–

शोभायात्रेत पंडित प्रदीप मिश्रा यांचे स्वागत करण्यासाठी चौका-चौकात शिवभक्तांची मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळलेली होती.

जीवन पाटील,कार्यकारी संपादक यांच्यासह रोहित पाटील, एम डी टी व्ही न्यूज ब्युरो,नंदुरबार

RECOMMENDED FOR YOU

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here