मुंबई :६/५/२३
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय अखेर अखेरीस मागे घेतला आहे.
पण, या पत्रकार परिषदेत अजित पवार गैरहजर होते.
त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले होते. पण ‘राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम राहण्याचा पवार साहेबांचा निर्णय आहे.
त्यांचा हा निर्णय राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा उत्साह, महाविकास आघाडीची ताकद वाढवणारा आहे, असं म्हणत अजितदादांनी निर्णयाचे स्वागत केलं आहे.
शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेनंतर अजित पवार यांनी एक पत्रक प्रसिद्ध करून आपली भूमिका मांडली आहे.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा.
राज्यातील, देशातील सर्वपक्षीय नेते, कार्यकर्त्यांचा आग्रह मान्य करुन पदावर कायम राहण्याचा घेतलेला निर्णय माझ्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा उत्साह वाढवणारा, राष्ट्रवादी काँग्रेस, महाविकास आघाडी, देशातील विरोधी पक्षांच्या एकजुटीला बळ देणारा आहे.
शरद पवारांनी राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम रहावे. असा आग्रह धरला होता.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा.
अध्यक्ष निवड समितीने निवृत्तीचा निर्णय फेटाळून लावला आणि हा निर्णय एकमताने घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे एक कुटुंब असून त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष राज्यात आणि देशात उज्जवल यश संपादन करेल’, असा विश्वास अजितदादांनी व्यक्त केला.
‘पवार साहेब राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम राहण्याचा निर्णय आपल्या सर्वांच्या आग्रहाखातर घेतला असून त्यांचे वय आणि प्रकृतीची काळजी घेऊन आपण सर्वांनी येणाऱ्या काळात अधिक जबाबदारी उचलावी, एकजुटीने आणि अधिक जोमाने काम करावे, साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक मजबूत करावा, असं आवाहनही अजित पवार यांनी केलं.
पवारांच्या सकारात्मक निर्णयानंतर आम्ही सर्वजण आता पुन्हा नव्या जोमाने पक्षाच्या कामाला लागलो आहोत. आज उशीरापर्यंत मुंबईत थांबल्यानंतर शनिवारपासून 6 तारखेला मी दौंड, कर्जत दौऱ्यावर जात आहे. 7 तारखेला बारामती, 8 तारखेला कोरेगाव, सातारा, 9 तारखेला सातारा, फलटण. 10 तारखेला उस्मानाबाद, लातूर, 11 तारखेला नाशिक आणि 12 तारखेला पुणे असा माझा दौरा कार्यक्रम असणार आहे, अशी माहितीही [ Ajit Pawar]अजित पवार यांनी दिली आहे.
एम डी टी व्ही न्यूज ब्युरो मुंबई