नाशिक: दि.११-०२-२०२३
भाजपच्या नेते पंकजा मुंडे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज एकाच कारने एकत्र भाजपच्या कार्यकारिणी बैठकीला आल्याचे पाहण्यास मिळाले. एकाच हॉटेलमध्ये आम्ही एकत्र थांबलो होतो, त्यांची गाडी पहिली आली त्यामुळे आम्ही सोबत आलो, असा खुलासा पंकजा मुंडे यांनी केला.
भाजपची प्रदेश कार्यकारिणी बैठक नाशिकमध्ये सुरू झाली आहे. आज या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्री, राज्यातील कॅबिनेट मंत्री हजर आहे. या बैठकीसाठी आज पंकजा मुंडे आणि देवेद्र फडणवीस हे एकाच कारने आले.
‘मी आणि देंवेंद्रजी एकाच हॉटेलमध्ये रहायला होतो. त्यांची गाडी लागली होती माझी गाडी मागे होती. त्यामुळेच मी त्यांच्या गाडीत बसtन कार्यकारिणी बैठकीला आले असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं.
‘भारतीय जनता पक्षाची कोर कमिटी सदस्य म्हणून मी कार्यकारणी बैठकीला उपस्थित होते. भाजपाची जी नियामानुसार कार्यकारणी व्हायला पाहिजे होती. ती बाकी असल्याने ती आता होत आहे. राजकीय प्रस्तावावर चर्चेसोबत आगामी कार्यक्रमांबद्दल चर्चा झाल्याचे देखील पंकजा मुंडे यांनी सांगितलं.
आजच्या या बैठकीत भाजप आणि शिंदे गटाचा राज्यात 200 चा नारा असणार आहे. लोकसभेसाठी मिशन 45 तर विधानसभेसाठी मिशन 200 असा नारा आजच्या कार्यकारणीत बैठकीत देणार आहे. या कार्यकारिणी बैठकीत लोकसभा-विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहे.
शुक्रवारी या बैठकीत लोकसभा प्रवास, स्वावलंबी भारत, मन की बात, एक भारत श्रेष्ठ भारत, फ्रेंड्स ऑफ बिजेपी, धन्यवाद मोदीजी, मतदार नोंदणी, डेटा व्यवस्थापन, युवा वॉरीयर्स, सोशल मीडिया आणि त्याचा वापर व विधानसभा प्रवास या विषयांचा आढावा घेण्यात आला.
नाशिकहून तेजस पुराणिक एम डी टी व्ही न्यूज,नाशिक