अकोला – ३०/३/२३
सोमवारी दुपारी ४ ते ६ दरम्यान शहरातील विविध ठिकाणावरील नागरिक आपल्या तक्रारी घेऊन आयुक्त मॅडम यांच्याकडे भेटण्यासाठी जातात
पण मात्र मनपा आयुक्त या तक्रारदारांच्या तक्रारी न ऐकता त्यांच्याकडील फक्त तक्रार अर्ज जमा करतात
व त्यांना आश्वासन देतात की आम्ही ते करू पण त्या तक्रारदारांनी काय तक्रार केली हे सविस्तर न जाणता नागरिक तक्रार करत असताना किंवा तो तक्रार सांगत असताना त्यांच्या बॉडीगार्ड हे त्या तक्रारदारास जाण्यास सांगतात
अशा प्रकारचा भोंगळ कारभार हा मनपा आयुक्त यांच्याकडून होत आहे
व दिलेल्या तक्रारीमध्ये कारवाई करण्यासाठी म्हणून तक्रारदाराला फक्त उडवा उडवी ची उत्तरे देतात
तर यावरून हे समजते की ज्या ठिकाणावरील अतिक्रमणाच्या तक्रारी ह्या त्यांच्याकडे आल्या असता त्या तक्रारींकडे दुर्लक्ष करून ज्या ठिकाणावरील तक्रार नाही आहेत त्या ठिकाणी मनमानी प्रकारे अतिक्रमणावरती कारवाई करतात पण सर्वसामान्यांनी लिहून दिलेल्या तक्रारींकडे दुर्लक्ष करतात
तर कुठेतरी शहरांमध्ये फक्त दाखवण्याचे काम करत आहेत का असा सवाल सुद्धा सर्वसामान्यांच्या व तक्रारदारांच्या मनात येतो
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/36S6BFu
व सोमवारी ४ ते ६ या दरम्यान जो भेटण्याचा वेळ असतो हा वेळ पूर्ण व्हायच्या पहिलेच आयुक्त मॅडम या निघून जातात व तसेच कुठल्या लोकप्रतिनिधी किंवा कुठल्या पक्षाचे पदाधिकारी किंवा पत्रकार हे जर दुसऱ्या कुठल्या दिवशी भेटायला गेले असता त्या ठिकाणी तेथील बाहेर बसलेले सिक्युरिटी वाले हे दोन मिनिटांसाठी सुद्धा आयुक्त मॅडम यांना भेटू देत नाहीत. म्हणजे एक आठवडा आयुक्त मॅडम ह्या असे कुठले काम करतात हेच पत्रकारांच्या व सर्वसामान्य जनतेच्या लक्षात येत नाही . याकडे वरिष्ठांनी जिल्हाधिकारी ,पालकमंत्री यांनी लक्ष द्यावे. असे सर्वसामान्यांचे व लोकप्रतिनिधी व पत्रकारांचे म्हणणे आहे
प्रतिनिधी अशोक भाकरे, अकोला
एम.डी.टी.व्ही.न्युज