नंदुरबारात तरुणाचा खून : चौघा संशयितांना १५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

0
1201
murder-of-youth-in-nandurbar-four-suspects-remanded-to-police-custody-till-april-15

नंदुरबार : कौटुंबिक वाद व जुन्या भांडणाच्या कारणावरून काल रविवारी नंदुरबार शहरातील एका ४५ वर्षीय तरुणाचा भरदिवसा खून झाल्याची घटना घडली आहे. यामुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, संशयित स्वताहून पोलिसात हजर झाला. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी चारही संशयितांना ताब्यात घेतले असून आज दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने चौघांना १५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीची आदेश दिले आहेत.

हे पण वाचा:- नंदुरबारात कौटूंबिक वादातून एकाचा खून – MDTV NEWS

आता WhatsApp वरमिळवाब्रेकिंगन्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्णमाहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/36S6BFu

याबाबत पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, नंदुरबार शहरातील आंबेडकर चौकातील रहिवासी कृष्णा आप्पा पेंढारकर (वय ४५) हे काल दुपारी उमापती महादेव मंदिर रस्त्याने जात होते. यावेळी चार जणांनी मागील भांडणाची कुरापत काढून त्यांच्यावर हल्ला केला. यावेळी संशयितांनी कृष्णा पेंढारकर यांच्यावर चाकू, लाकडी डेंगारा तसेच पिस्तुलीने गोळ्या झाडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या हल्ल्यात कृष्णा आप्पा पेंढारकर हे गंभीर जखमी होऊन जागीच गतप्राण झाले.

हे पण वाचा:- नंदुरबारात कौटूंबिक वादातून एकाचा खून – MDTV NEWS

आता WhatsApp वरमिळवाब्रेकिंगन्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्णमाहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/36S6BFu

सदर घटनरचे वृत्त शहरात वाऱ्यासारखे पसरले. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, शहर पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, तालुका पोलीस निरीक्षक राहुल पवार, नियंत्रण कक्षाचे पोलीस निरीक्षक नरेंद्र भदाणे, उपनगरचे सपोनि दिनेश भदाणे,शहर पोलीस ठाण्याचे सपोनि प्रतापसिंग मोहिते, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील,सागर आहेर आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनसाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला.

आता WhatsApp वरमिळवाब्रेकिंगन्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्णमाहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/36S6BFu

दरम्यान, या घटनेतील एक संशयित स्वताहून पोलिसात हजर झाला होता.पोलिसांनी अधिक तपास करीत स्वप्नील उर्फ रवी भगवान जावरे, आकाश उर्फ शंकर भगवान जावरे, सागर भगवान जावरे व भगवान गिरधर जावरे या चौघांविरोधात भादवी कलम ३०२, १२०(ब), ३४ सह भारतीय हत्यार कायदा १९५९ चे कलम ३ चे उल्लंघन, २५ व ७ चे उल्लंघन २७ अनवये महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१)(३)चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी चारही संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांना आज दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने चौघांना १५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीचे आदेश दिले आहेत.

एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो, नंदुरबार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here