मविआ : लोकसभेच्या जागावाटपाचं सूत्र ठरलं ? अजितदादांनी सांगितला प्लॅन!

0
197

पुणे : महाविकास आघाडीच्या बैठकीत २०२४ च्या लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा झाल्याची माहिती राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली. कर्नाटक निकालानंतर तातडीने शरद पवार यांनी मविआची बैठक बोलावून त्या बैठकीत आगामी निवडणुकांवर चारचा होऊन रणनीती आखण्यात आल्याचे अजित पवार यांनी सांगितलं. याबाबत संजय राऊत, नाना पटोले यांनी आधीच माहिती दिली असल्याचंही अजित पवार म्हणाले.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

२०१४ सालापासून काही राज्यांचा अपवाद वगळता मोदी यांचं सरकार आलं. यामुळे भाजपमध्ये जोश आणि उत्साह पाहायला मिळायचा. कर्नाटकचा निकाल आला आणि एक्झिट पोलचा पण निकाल फेल ठरला. त्यामुळे सगळ्यांचा उत्साह द्विगुणित झालेला पाहायला मिळाला, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी कर्नाटक निकालावर दिली

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

तर २०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुढची प्लॅनिंग कशी असली पाहिजे? तसंच वज्रमुठ सभेबद्दल चर्चा झाली. आगामी निवडणूकसाठी महाविकास आघाडी म्हणून ४८ जागांचं वाटप करावी, अशी चर्चा झाली. पुन्हा निवडणुका लागल्यावर घाई नको. जागा वाटप झाल्यावर काही नाव तिन्ही पक्ष देतील आणि सहा लोकं बसून कश्या जागा वाटप करायचं यावर चर्चा करू. केवळ मविआ नाही तर जे आमचे समर्थक पक्ष आहेत त्यांचाही समावेश आम्ही करून घेऊ असंही अजित पवार शेवटी म्हणाले.

तेजस पुराणिक नाशिक, सह एमडीटीव्ही न्यूज ब्युरो पुणे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here