मुंबई : २५/३/२०२३
शिक्षणाची खात्री देणे आणि मुलींच्या आरोग्याचा दर्जा वाढविणे, यासाठी 1 एप्रिल 2016 पासून माझी कन्या भाग्यश्री योजना या योजनेचा राज्यामध्ये शुभारंभ केला, हि योजना महाराष्ट्र राज्यातील सर्व दारिद्य रेषेखाली येणाऱ्या कुटुंबात जन्माला येणाऱ्या दोन मुलींसाठी या योजनेचा लाभ मिळणार आहे त्याचप्रमाणे दारिद्र्य रेषेवरील (APL) कुटुंबात जन्माला येणाऱ्या मुलींसाठी सुद्धा या योजनेचा काही प्रमाणात लाभ देण्यात येणार आहे.
शासनाच्या वित्त विभागाने सुचविल्याप्रमाणे 1 एप्रिल 2016 लागू करण्यात आलेली
माझी कन्या भाग्यश्री योजनेमध्ये अमुलाग्र बदल करून शासन निर्णयानुसार अधिक्रमित करून माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजना दिनांक 1 ऑगस्ट 2017 पासून ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 7.50 लाख रुपये पर्यंत आहे
आशा समाजातील सर्व नागरिकांसाठी लागू करण्यात येत आहे.
या योजनेमध्ये ज्या मातेने किंवा पित्याने एका मुलीच्या जन्मा नंतर लगेच एक वर्षाच्या आत परिवार नियोजन केले आहे,
अशा कुटुंबातील मुलीच्या नावाने 50,000/-रुपये सरकार व्दारा बँक मध्ये जमा केले जाईल, त्याचप्रमाणे या योजने मध्ये ज्या माता किंवा पित्याने
दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर लगेच परिवार नियोजन केले आहे,
त्यांना परिवार नियोजन केल्यानंतर दोन्ही मुलींच्या नावाने शासनाकडून 25000/–25000/- रुपये बँकेमध्ये जमा केले जाईल. तसेच माझी कन्या भाग्यश्री योजना अंतर्गत महाराष्ट्रातील एका व्यक्तीच्या दोन मुलींनाच या योजनेचा लाभ मिळेल,
या योजनेच्या अंतर्गत सुरवातील ज्या दारिद्र्य रेषेखालील (BPL) कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न एक लाख पर्यंत होते त्याच कुटुंबाना या योजनेचा लाभ देण्यात येत होता.
शासनाच्या नवीन निर्णयानुसार या योजनेच्या अंतर्गत मुलींच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्नाची मर्यादा वाढऊन एक लाखावरून 7.5 लाख रुपये करण्यात आली आहे.
या व्यतिरिक्त मुलीचा जन्म झाल्यापासून मुलगी अठरा वर्षाची होईपर्यंत या योजने अंतर्गत अधिकचे लाभ देण्यासाठी शासनाने मंजुरी दिली आहे.
माझी कन्या भाग्यश्री योजना 2023 महाराष्ट्र उद्दिष्टे (Objectives)
महाराष्ट्र शासनाने माझी कन्या भाग्यश्री योजना 2023 सुरु करण्याचा उद्देश मुलींच्या जन्माबाबत समाजामध्ये सकारत्मक विचार निर्माण करणे, लिंग निवडीस प्रतिबंध घालणे तसेच मुलींच्या शिक्षणाविषयी समाजाला प्रोत्साहन देणे, समाजामध्ये परंपरेनुसार मुलाच्या जन्मावर आनंदोत्सव साजरा केल्या जातो
परंतु मुलींच्या जन्मानंतर असे घडत नाही, जनमानसाची हि मुलींबद्दलची मानसिकता बदलविणे आणि त्यांना मुलींचे योग्य पालनपोषण करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी या योजनेच्या अंतर्गत शासनाकडून आर्थिक सहाय्य केले जाते,
या योजने अंतर्गत मिळणाऱ्या आर्थीक मदतीव्दारे मुलीनी आपले शक्षण पूर्ण करावे जेणेकरून पुढे निर्माण होणारी मातांची पिढी हि शिक्षित होईल आणि त्यामुळे पुढे येणारी त्यांची मुले व मुली आरोग्यसंपन्न आणि शिक्षित निर्माण होईल व त्यामुळे मुलगा आणि मुलगी हा भेदभाव कमी होण्यास मदत होईल, हा शासनाचा उद्देश आहे.
माझी कन्या भाग्यश्री योजना महाराष्ट्र योजनेचा उद्देश राज्यातील विषम लिंगअनुपात सुधारणे त्याच बरोबर मुलींचे प्रमाण वाढविणे, आणि तसेच मुलींच्या शिक्षणामध्ये या आर्थिक मदतीचा उपयोग करता येईल..
या योजनेंतर्गत आर्थिक मदत देऊन मुलींना शिक्षित आणि स्वयंपूर्ण बनविणे हा उद्देश शासनाचा आहे.
लिंग निवडीस प्रतिबंध करणे
बालिकांचा जन्मदर वाढविणे
मुलींच्या जीवनमानाबद्दल खात्री देणे
मुलींचा समान दर्जा आणि शैक्षणिक प्रोत्साहनाकारीता समाजात कायमस्वरूपी सामुदायिक चळवळ निर्माण करणे
मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन तथा खात्री देणे
सामाजिक महत्वाच्या संस्था म्हणून पंचायती राज संस्था, शहरी स्थानिक समित्या आणि स्थानिक स्तरावरील कर्मचारी यांना या योजनेसाठी प्रशिक्षण देणे या कामामध्ये स्थानिक समुदाय महिला मंडळे, महिला बचत गट व युवक मंडळ यांचा सहभाग वाढविणे.
जिल्हा, तालुका आणि निम्नस्तरावर विविध संस्था व सेवा देणारे विभाग यांचा समन्वय घडवून आणणे.
Maharashtra Majhi Kanya Bhagyashree Yojana (Features):
योजनेचे स्वरूप देशातील मुलींचे सबळीकरण करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने सुरवातीला बेटी बचाओ बेटी पाढाओ हि योजना सुरु केली होती,
या योजनेसाठी भारतातील शंभर जिल्हांची निवड करण्यात आली होती, यामध्ये महाराष्ट्रातील बीड, जळगाव, अहमदनगर, बुलढाणा, औरंगाबाद, वाशीम, कोल्हापूर, उस्मानाबाद, सांगली, व जालना या दहा जिल्हांची निवड करण्यात आली होती.
या योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने सुकन्या योजना राज्यामध्ये लागू केली होती, त्यानंतर या योजनेमध्ये अमुलाग्र बदल करून सुधारित माझी कन्या भाग्यश्री योजना संपूर्ण महाराष्ट्रात सुरु करण्यात आली.
माझी कन्या भाग्यश्री योजना हि नवीन सुधारित योजना संपूर्ण महाराष्ट्रात राबविली जाणार आहे..
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती ! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईनकरा. https://bit.ly/36S6BFu
या योजनेच्या अंतर्गत समाजातील सर्व वर्गातील दारिद्र्य रेषेखालील (BPL) कुटुंबात जन्मणाऱ्या प्रत्येक मुलीला या योजनेचा लाभ मिळणार आहे, तसेच शासनच्या नवीन नियमानुसार दारिद्र्य रेषेवरील (APL) पांढरे रेशनकार्ड असणाऱ्या कुटुंबात जन्मणाऱ्या मुलींना सुद्धा या योजनेचा फायदा मिळणार आहे, या योजनांतर्गत सुरवातीला मुलगी सहा वर्षाची असतांना जमा रक्कमेच्या व्याजाची धनराशी मिळेल,
या नंतर दुसऱ्या वेळेस मुलगी बारा वर्षाची झाल्यावर व्याजाची रक्कम मिळेल, तसेच मुलगी पूर्ण अठरा वर्षाची झाल्यावर तिला पूर्ण धनराशी मिळेल. योजनेमध्ये मुलगी आणि तिची माता याच्या नावाने बँकेमध्ये संयुक्त सेविंग खाते उघडण्यात येईल
ज्यामध्ये सरकार व्दारा वेळोवेळी धनराशी जमा केल्या जाईल.
महाराष्ट्र माझी कन्या भाग्यश्री योजना 2023 मध्ये मुलीची शैक्षणिक पात्रता कमीतकमी दहावी असणे आवश्यक आहे.
माझी कन्या भाग्यश्री योजना मुख्य Highlights
योजना: माझी कन्या भाग्यश्री योजना
राज्य – महाराष्ट्र
योजनेची सुरुवात -1 एप्रिल 2016
अधिकृत वेबसाईट- maharashtra.gov.in
लाभार्थी राज्याच्या मुली-
उद्देश -मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी आर्थिक व्यवस्था करणे
व्दारा सुरु -महाराष्ट्र सरकार
विभाग- महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र
(Features): योजनेचे स्वरूप :-
देशातील मुलींचे सबळीकरन करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने सुरवातीला बेटी बचाओ बेटी पाढाओ हि योजना सुरु केली होती, या योजनेसाठी भारतातील शंभर जिल्हांची निवड करण्यात आली होती यामध्ये महाराष्ट्रातील बीड, जळगाव, अहमदनगर, बुलढाणा, औरंगाबाद, वाशीम, कोल्हापूर, उस्मानाबाद, सांगली, व जालना या दहा जिल्हांची निवड करण्यात आली होती. या योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने सुकन्या योजना राज्यामध्ये लागू केली होती, त्यानंतर या योजनेमध्ये अमुलाग्र बदल करून सुधारित माझी कन्या भाग्यश्री हि योजना संपूर्ण महाराष्ट्रात सुरु करण्यात आली,
माझी कन्या भाग्यश्री योजना हि नवीन सुधारित योजना संपूर्ण महाराष्ट्रात राबविली जाणार आहे, या योजनेच्या अंतर्गत समाजातील सर्व वर्गातील दारिद्र्य रेषेखालील (BPL) कुटुंबात जन्मणाऱ्या प्रत्येक मुलीला या योजनेचा लाभ मिळणार आहे,
तसेच शासनच्या नवीन नियमानुसार दारिद्र्य रेषेवरील (APL) पांढरे रेशनकार्ड असणाऱ्या कुटुंबात जन्मणाऱ्या मुलींना सुद्धा या योजनेचा फायदा मिळणार आहे, या योजनांतर्गत सुरवातीला मुलगी सहा वर्षाची असतांना जमा रक्कमेच्या व्याजाची धनराशी मिळेल,
या नंतर दुसऱ्या वेळेस मुलगी बारा वर्षाची झाल्यावर व्याजाची रक्कम मिळेल, तसेच मुलगी पूर्ण अठरा वर्षाची झाल्यावर तिला पूर्ण धनराशी मिळेल. योजनेमध्ये मुलगी आणि तिची माता याच्या नावाने बँकेमध्ये संयुक्त सेविंग खाते उघडण्यात येईल ज्यामध्ये सरकार व्दारा वेळोवेळी धनराशी जमा केल्या जाईल.
माझी कन्या भाग्यश्री योजना पात्रता व नियम
सुकन्या योजना माझी कन्या भाग्यश्री योजने मध्ये समाविष्ट करण्यात आल्यामुळे सुकन्या योजनेच्या अटी आणि नियम हे माझी कन्या भाग्यश्री योजनेला लागू राहतील त्याचप्रमाणे सुकन्या योजनेमधील मुलींना माझी कन्या भाग्यश्री योजनेमध्ये सामाविष्ट करण्यात आले आहे.
या योजनेच्या अंतर्गत योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करतेवेळी मातेने किंवा पित्याने परिवार नियोजनाचा दाखला सादर करणे आवश्यक आहेयोजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी मुलींचे वडील महाराष्ट्राचे कायम निवासी असणे आवश्यक आहे योजनेचा लाभ मिळविण्यासाठी अर्ज करतांना मुलीचे जन्म नोंदणी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
योजनेमध्ये दुसऱ्या प्रसुतीच्या वेळेस जर जुळ्या मुली झाल्या तर त्या या योजनेस पात्र राहतील.
या योजनेच्या अंतर्गत अठरा वर्षांनी मिळणारी डीपॉझीट केलेली मूळ रक्कम आणि त्यावर मिळणारी व्याजाची रक्कम प्राप्त करण्यासाठी मुलीचे वय अठरा वर्षे पूर्ण असले पाहिजे त्याचबरोबर मुलगी कमीतकमी दहावी उतीर्ण असणे आवश्यक आहे आणि मुलगी अविवाहित असणे आवश्यक आहे.
हि योजना दारिद्र्य रेषेखालील (BPL) तसेच दारिद्र्य रेषेवरील (APL) कुटुंबात जन्मणाऱ्या दोन मुलींना लागू असेल तसेच कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न सात लाख पन्नास हजार रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.एखाद्या कुटुंबाने अनाथ मुलीला दत्तक घेतले असेल तर त्या मुलीला त्या कुटुंबाची प्रथम मुलगी मानून या योजनेचा लाभ तिला मिळण्यात येईल, त्याचप्रमाणे बालगृहातील अनाथ मुलींसाठी हि योजना लागू राहील.
लाभ (Benefits):-
महाराष्ट्र राज्यात सुरुवातीला असलेल्या सुकन्या योजनेचे लाभ कायम ठेऊन नवीन सुधारित माझी कन्या भाग्यश्री हि योजना राज्यात सुरु करण्यात आली आहे, या योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांना अधिक लाभ देण्यात येणार आहेत, हि योजना संपूर्ण महाराष्ट्र राज्यात राबविली जाणार आहे. माझी कन्या भाग्यश्री योजना अंतर्गत दोन प्रकारच्या लाभार्थ्यांना लाभ मिळविता येतो.
लाभार्थी एक प्रकारामध्ये कुटुंबामध्ये एक मुलगी आहे व मातेने कुटुंब नियोजन केले आहे
लाभार्थी प्रकार दोनमध्ये कुटुंबामध्ये एक मुलगी आहे आणि मातेने दुसऱ्या मुलीनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेली आहे. अशा परिस्थितीत दोन्ही मुलींना योजनेचा लाभ देय राहील, परंतु ज्या कुटुंबामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी अशी अपत्ये आहेत त्या कुटुंबाला या योजनेचा लाभ मिळणार नाही.
माझी कन्या भाग्यश्री योजना सुधारित दिनांक 1 ऑगस्ट 2017 पासून नवीन निर्णयाप्रमाणे ज्या परिवारचे वार्षिक उत्पन्न 7.5 लाख रुपये पर्यंत आहे अशा समाजातील सर्व नागरीकांसाठी लागू करण्यात येत आहे. या योजनेचा लाभ खालीलप्रमाणे राहील.
पहिल्या प्रकारामध्ये कुटुंबामध्ये एका मुलीनंतर, मातेने किंवा पित्याने कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया केल्यानंतर शासनाकडून मिळणारी अनुदानाची रक्कम रुपये 50,000/- राष्ट्रीयकृत बँकमध्ये मुदत ठेव योजनेत गुंविण्यात येईल.
यानंतर बँकेमध्ये मुलीच्या नावे मुदत ठेवीत गुंतविलेले 50,000 रुपये रकमेवर सहा वर्षात देय असलेले फक्त व्याज मुलीला वयाच्या सहाव्या वर्षी काढता येईल.
पुढे पुन्हा मुद्दल 50,000/- रुपये मुदत ठेवीत गुंतवणूक करून सहा वर्षासाठी देय असलेले फक्त व्याज वयाच्या बाराव्या वर्षी मुलीला काढता येईल
त्यांनंतर पुढे पुन्हा 50,000/- रुपये मुदत ठेवीत गुंतवणूक करून सहा वर्षासाठी देय असलेले व्याज प्लस मुद्दल दोन्ही रक्कम वयाच्या अठराव्या वर्षी मुलीला काढता येईल.
कुटुंबामध्ये मुलीचा जन्म झाल्यांनंतर माता किंवा पित्याने परिवार नियोजन शस्त्रक्रिया केली असेल आणि तसे प्रमाणपत्र सादर केल्यानंतरच 50,000/- रुपये एवढी रक्कम मुलीच्या नावाने जमा केल्या जाईल आणि
अशा प्रकारे बँकमध्ये मुदत ठेवीमध्ये जमा केलेल्या रकमेवर त्यावेळी मुलीच्या वयानुसार देय असलेली व्याजाची रक्कम मुलीला मिळण्यात येईल.
दुसऱ्या प्रकारामध्ये कुटुंबामध्ये दोन मुलीनंतर मातेने किंवा पित्याने कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया केल्यानंतर शासनाकडून देय असलेली अनुदानाची रक्कम पहिल्या आणि दुसऱ्या मुलीच्या नावाने प्रत्येकी रुपये 25,000/- याप्रमाणे 50,000/- रुपये एवढी रक्कम दोन्ही मुलींच्या नावाने बँकेमध्ये मुदत ठेव योजनेमध्ये गुंतविण्यात येईल.
त्यानंतर बँकेमध्ये मुलीच्या नावे मुदत ठेवीत गुंतविलेले 25,000 रुपये रकमेवर सहा वर्षात देय असलेले फक्त व्याज मुलीला वयाच्या साहव्या वर्षी काढता येईल.
पुढे पुन्हा मुद्दल 25,000/- रुपये मुदत ठेवीत गुंतवणूक करून सहा वर्षासाठी देय असलेले फक्त व्याज वयाच्या बाराव्या वर्षी मुलीला काढता येईल
त्यांनंतर पुढे पुन्हा 25,000/- रुपये मुदत ठेवीत गुंतवणूक करून सहा वर्षासाठी देय असलेले व्याज प्लस मुद्दल दोन्ही रक्कम वयाच्या अठराव्या वर्षी मुलीला काढता येईल.
कुटुंबामध्ये मुलीचा जन्म झाल्यांनंतर माता किंवा पित्याने परिवार नियोजन शस्त्रक्रिया केली असेल ..
तसे प्रमाणपत्र सादर केल्यानंतरच 25,000/- रुपये एवढी रक्कम मुलीच्या नावाने जमा केल्या जाईल
आणि अशा प्रकारे बँकमध्ये मुदत ठेवीमध्ये जमा केलेल्या रकमेवर त्यावेळी मुलीच्या वयानुसार देय असलेली व्याजाची रक्कम मुलीला मिळण्यात येईल.
माझी कन्या भाग्यश्री योजना आवश्यक कागदपत्र:
लाभार्थी मुलीचे पालक महाराष्ट्राचे कायमचे रहिवासी असणे आवश्यक आहे, पालकाचे अधिकृत राहिवासी प्रमाणपत्र
मुलींचे जन्म नोंदणी प्रमाणपत्र
लाभार्थी कुटुंबाने योजनेसाठी अर्ज करतेवेळी एका मुलीनंतर कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया केल्याचे प्रमाणपत्र
योजनेसाठी अर्ज कारणाना लाभार्थी कुटुंबाने दोन मुलींच्या नंतर कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया केल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र
अर्जदाराचे आधार कार्ड
BPL श्रेणी रेशनकार्ड
मिळकत प्रमाणपत्र
अर्जदाराचे मोबाइल नंबर
मुलीचे व मातेचे बँक पासबुक
पासपोर्ट साईज फोटो
माझी कन्या भाग्यश्री योजना 2023 अर्ज करण्याची प्रक्रिया:
महाराष्ट्र राज्यातील ज्या पात्र पालकांना माझी कन्या भाग्यश्री या योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईट Official Website वर जाऊन माझी कन्या भाग्यश्री योजना चा एप्लिकेशन फॉर्म PDF [Application form PDF] डाऊनलोड करावा लागेल, अर्जामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती जसे पालकाचे नाव, मुलीचे नाव, मोबाइल नंबर, मुलीचे जन्म प्रमाणपत्र इत्यादी संपूर्ण तपशीलवार माहिती भरून आणि अर्जाला सर्व आवश्यक कागदपत्र जोडून, अर्ज संबधित महिला व बाल विकास कार्यालयात जाऊन जमा करावा लागेल, अशा प्रकारे आपली माझी कन्या भाग्यश्री योजना 2023 मध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.
वाचकहो ,या लेखामध्ये आम्ही माझी कन्या भाग्यश्री योजनेबद्दल संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे तरीही आपल्याला आणखी या योजनेबद्दल माहिती जाणून घायची असल्यास आपण योजनेच्या सबंधित कार्यालयात जाऊन माहिती घेऊ शकता..
माझी कन्या भाग्यश्री हि महाराष्ट्र सरकारची महत्वकांक्षी योजना आहे. राज्यातील नागरिकांनी मुलींच्या उज्वल भवितव्यासाठी या योजनेचा लाभ अवश्य घ्यावा. आणि या योजनेबद्दल जास्तीत जास्त पालकांना जागरूक करावे.
संकलन : जीवन पाटील ,कार्यकारी संपादक ,एम डी टी व्ही न्यूज ,नंदुरबारसह तेजस पुराणिक नाशिक जिल्हा प्रतिनिधी एम डी टी व्ही न्यूज.