मुंबई -३०/५/२३
नुकतीच आज 30 मे 2023 रोजी राज्य सरकारची मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.. बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते
या मंत्रिमंडळ बैठकीत विविध महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबवणार तसंच पीएम किसान योजनेची कार्यपद्धती सुधारणार असल्याचा देखील स्पष्ट करण्यात आलं
ठळक मुद्दे:
*प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे कार्यपद्धतीत सुधारणा करण्याचा आणि महा सन्मान निधी योजना राबवण्याचा निर्णय
*2023 24 च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये घोषित केल्याप्रमाणे अन्नदाता बळीराजाच्या उत्पन्न वाढीसाठी प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्माननिधी ही योजना राबवणार
*या योजनेतून प्रतिवर्ष रक्कम सहा हजार रुपये लाभ पात्र लाभार्थींच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे जमा करण्यात येणार
*पहिला हप्ता एप्रिल ते जुलै 2000 रुपये
*दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर 2000 रुपये
*तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च 2000 रुपये
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
*प्रधानमंत्री किसान सन्मान योजनात पीएम किसान पोर्टलवर नोंदणी करणे व पात्र लाभार्थींना मान्यता देण्यासंदर्भात कार्यपद्धतीत सुधारणा
वरील या सर्व ठळक मुद्द्यांचा समावेश या निर्णयात करण्यात आला आहे… यावेळी या विभागाचे मंत्री आणि यांच्यासह विभागाचे सचिव अप्पर सचिव आणि अधिकारी उपस्थित होते..
एम डी टी व्ही न्यूज ब्युरो ,मुंबई