Nandurbar Crime : घातपात की आत्महत्या ; 150 फूट खोल दरीत आढळला युवकाचा मृतदेह

0
563

Nandurbar Crime  – धडगाव तालुक्यातील काकडदा नजिक असलेल्या वलवाल या गावात एक 27 वर्षीय तरुणाचा मृतदेह दरीत आढळून आला आहे. अमरसिंग डेका पावरा असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

download

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमरसिंग पावरा हा वलवाल गावाचा रहिवासी होता. त्याचा मृतदेह आज सकाळी दरीत आढळून आला. पावरा हा दरीत कसा पडला याबाबत अद्याप काही माहिती मिळू शकलेली नाही.

घटनेची माहिती मिळताच धडगाव पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी व वलवाल ग्रामस्थांच्या मदतीने दरीत उतरून मृतदेह काढण्यात आला. हा मृतदेह शवविच्छेदनासाठी धडगाव ग्रामीण रुग्णालय येथे नेण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, पावरा यांचा घातपात की आत्महत्या हे स्पष्ट होईल.

गोपाल पावरा धडगांव प्रतिनिधी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here