Nandurbar News – नंदुरबार पंचायत समितीच्या स्व,हेमलता ताई वळवी सभागृहात पिठासीन अधिकारी तथा तहसीलदार नितीन गरजे व गटविकास अधिकारी जयंतराव उगले यांच्या उपस्थितीत विशेष सभा घेण्यात आली पंचायत समितीच्या ठरलेल्या कालावधीत सौ मायाताई माळचे (वळवी) यांनी राजीनामा दिल्याने धुळे- नंदुरबार जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख मा,आ, चंद्रकांत रघुवंशी यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समिती नंदुरबार येथील सत्ता शिवसेनेच्या(शिंदे गट)ताब्यात ठेवली.
आज दिनांक 12 /10 /2023 रोजी सकाळी 11 वाजेपासून निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली फॉर्म भरणे छाननी माघार इत्यादी प्रक्रिया पूर्ण करत दुपारी तीन वाजेला पिठासीन अधिकारी तथा तहसीलदार नितीन गरजे यांनी सौ दीपमाला अविनाश भिल यांच्या एकमेव अर्ज असल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले सभेला शिवसेना शिंदे गटाचे बारा सदस्य उपस्थित होते विरोधी बी जे पी गटाचे सदस्य सभेस अनुपस्थित होते,
सौ दीपमाला अविनाश भिल यांच्या अर्जावर सूचक म्हणून सदस्य संतोष साबळे तर अनुमोदक म्हणून तेजस पवार होते. निवडीची घोषणा होताच कार्यकर्त्यांनी ढोल ताश्यांचा गजरात फटाके फोडून एकच जल्लोष केला पंचायत समिती परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पंचायत समिती सभापती दालनात शिवसेना(शिंदे गट) जिल्हाप्रमुख अँड राम भैय्या रघुवंशी यांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारला यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष वकील आबा पाटील रमेश दादा गावित बीके अण्णा पाटील शिवसेना तालुकाप्रमुख डॉ सयाजीराव मोरे जिल्हा परिषद सदस्य देवमन पवार कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती
विक्रम सिंग वळवी संचालक किशोर पाटील गोपीचंद काका पवार दिनेश पाटील भाऊसाहेब शिंत्रे रोहिदास राठोड माजी जि प सदस्य अंबु दादा भिल माजी उपसभापती कमलेश महाले दीपक मराठे गुड्डू भैया परदेशी जितू पवार सुनील वसावे उपसभापती प्रल्हाद राठोड यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी सरपंच शिवसेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
नारायण ढोडरे
प्रतिनिधी- ग्रामीण नंदुरबार