मा.आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती मागणी ; एकतर्फी नियुक्तीचा आरोप!
नंदुरबार :- नंदुरबार जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या संजय गांधी निराधार समिती नेमणुकीला मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानुसार नंदुरबार जिल्हाधिकारी यांनी स्थगिती दिली आहे. संजय गांधी निराधार समितीसह इतर समितींवर एकतर्फी सदस्य नेमणूकीचा आरोप करीत माजी आमदार तथा शिवसेवसेनेचे संपर्क नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार करीत निवेदन सादर केले होते. त्यावर तातडीने नेमणुकीला स्थगिती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी या निवडीला स्थगिती दिली आहे.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
नंदुरबार जिल्ह्यतील संजय गांधी निराधार समितीची नुकतीच निवड करण्यात आली आहे. मात्र या निवडीला माजी आमदार तथा शिवसेनेचे संपर्क प्रमुख चंद्रकांत रघुवंशी यांनी विरोध केला आहे. जिल्ह्यातील पालकमंत्र्यांनी एकतर्फी त्यांच्याच कार्यकर्त्यांची या समितीवर वर्णी लावत शिवसेनेवर अन्याय केल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांना दिलेल्या निवेदनावर श्री रघुवंशी यांनी म्हटले आहे. निवेदनानुसार नंदुरबार जिल्हयात ६ तालुके असुन या सर्व ठिकाणी जिल्हयांचे पालकमंत्र्यांनी एकतर्फी त्यांचेच कार्यकर्त्यांची वर्णी लावून नेमणूक केलेली आहे. शिवसेनेच्या दोन्ही जिल्हा प्रमुखांनी सुचविलेल्या नावांपैकी फक्त नावापुरते दोन-दोन लोकप्रतीनिधींची नेमणूक करुन बाकी सर्व समितींच्या जागेवर त्यांच्याच गटाचे सदस्यांची नेमणूक केलेली आहे.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
युतीच्या धोरणाप्रमाणे जिथे भारतीय जनता पार्टीच्या आमदार असतील तिथे ६० टक्के भाजपा व ४० टक्के सदस्य शिवसेनेचे असतील, तसेच काँग्रेस अथवा राष्ट्रवादीचा आमदार असल्यास ५०-५० टक्के पक्षाचे असतील असे ठरले असतांना शिवसेनचे फक्त दोन-दोन सदस्य प्रत्येक समितीवर घेवुन व सर्व समितीचे प्रमुख त्यांचेच नेमून पालकमंत्र्यांनी एक प्रकारे शिवसेनेवर अन्यायच केले असल्याचे म्हटले होते.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
नंदुरबार जिल्हयाचा सर्व समितींच्या नेमणूकीना स्थगीती देण्यात यावी अशी मागणी माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी निवेदनाद्वारे केली होती. या मागणीची तात्काळ दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय गांधी निराधार समितीच्या निवडीला स्थगिती देण्याचे निर्देश दिल्याने नंदूरबार जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी याबाबत स्थागितीचे आदेशाचे पत्र तहसीलदारांना दिले आहे.
एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो, नंदुरबार.