नंदुरबार : शहरातील सोनार गल्लीत दुकानासमोर लिंबू फेकल्याच्या संशयावरून एकास शिवीगाळ करीत हाताबुक्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, नंदुरबार शहरातील कपील चंद्रशेखर सोनार यांच्या दुकानासमोर दीपक श्रीराम सोनार यांनी लिंबू फेकल्याच्या जाब विचारल्याच्या वादातून कपील सोनार यांना दीपक सोनार याने शिवीगाळ करीत हाताबुक्यांनी मारहाण केली.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
तसेच हाताच्या पंजास चाकूने दुखापत केली. याबाबत कपील सोनार यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात दीपक सोनार याच्याविरोधात भादंवि कलम ३२४, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.नरेंद्र पाटील करीत आहेत.
एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो, नंदुरबार.


