Nandurbar News – नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील गोमाई नदीत सोमवारी (ता. 9) दुपारी मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या 20 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली.
पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाच्या औषधनिर्माणशास्त्र पदविकेच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत असलेला प्रतीकेश विश्वनाथ पाटील (वय 20, रा. चिखली, ह.मु. विद्याविहार, ता. शहादा) हा मित्रांसोबत दरा फाट्याजवळील गोमाई नदीतील पांडवलेणी भागात पोहण्यासाठी गेला होता. पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडला. त्याच्या मित्रांनी त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण तो अपयशी ठरला.
: हेही वाचा :
- Trump Vs Modi : एका फोन कॉलची किंमत ५००% टॅरिफ? मोदी-ट्रम्प यांच्यातील ‘कोल्ड वॉर’ सुरू..!
- Maharashtra Expressway – ‘समृद्धी’नंतर महाराष्ट्राला मिळणार ‘पुणे-बंगळूर’ ग्रीन फील्ड…!
- Shreyas Iyer ची प्रकृती चिंताजनक सिडनीतील रुग्णालयात ICU मध्ये उपचार सुरू..!
- देशाचे ५३ वे सरन्यायाधीश कोण ? CJI Gavai यांनी सुचवले मोठे नाव..
- बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी Maharashtra Schools चा मोठा निर्णय! एक्झाम फॉर्म भरण्यासाठी आता ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ
प्रतीकेशला शासकीय रुग्णालय शहादा येथे दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून तपास सुरू होता. प्रतीकेश हा एकुलता मुलगा होता. कुटुंबीयांकडून तरुण मुलाचा मृत्यू झाल्याची वार्ता कळताच शोककळा पसरली.


