Nandurbar News : साळवे ग्रामपंचायतातील 35 लाखांचा भ्रष्टाचार उघड..!

0
106
nandurbar-news-35-lakh-corruption-in-salve-gram-panchayat-exposed

Nandurbar News – शिंदखेडा तालुक्यातील साळवे ग्रामपंचायतमध्ये विकासकामासाठी मिळालेल्या 35 लाख 6 हजार 440 रुपयांच्या निधीचा अपहार झाल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी शिंदखेडा पोलीस ठाण्यात तत्कालीन सरपंच श्रीमती इंदुबाई पुंडलिक फुलपगारे, ग्रामसेवक कै.राजेश सुकलाल सुर्यवंशी व योगेश विष्णू महाजन यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतची माहिती देताना शिंदखेडा पंचायत समितीचे ग्रामपंचायत विभाग विस्तार अधिकारी कपिल नवलसिंग वाघ यांनी सांगितले की, साळवे ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच संतोष वाघ यांच्यासह काही ग्रामपंचायत सदस्यांनी विविध विकासकामांमध्ये,ग्रामनिधीचा भ्रष्टाचार झालेला, होत असलेला विषयी संबंधीत पंचायत समिती ग्रामपंचायत विभाग व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे येथे सन -2021 पासुन तक्रारी अर्ज देत होते.

nandurbar-news-35-lakh-corruption-in-salve-gram-panchayat-exposed

‘एम.डी टीव्ही’ चं Telegram  Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

‘एम.डी टीव्ही’ चं Facebook  Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

या तक्रारीत सांगण्यात आले होते की, साळवे ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करुन संबंधितांवर योग्य ती कार्यवाही व्हावी. तक्रारीत नमूद करण्यात आलेल्या मुद्द्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन, आदिवासी वस्तीत हाळ बांधकाम, पि.हि.सि. भूमिगत गटार, जल जीवन मिशन अंतर्गत नळ जोळणि व पाईपलाईन, पेव्हर ब्लॉक बसविणे, 14 वा वित्त आयोग व 15 वा वित्त आयोग पेव्हर ब्लॉक बसविणे, पाण्याचे ट्रकंर, पथदिवे, पाणी फाउंडेशन संस्थेमार्फत मिळालेले बक्षीस अनुदान, कौशल्य विकास केंद्र बहुउद्देशीय सभामंडप, व्यायाम शाळा बांधकाम यांचा समावेश होता.

या तक्रारीची गंभीरपणे दखल घेत पंचायत समितीचे ग्रामपंचायत विभाग विस्तार अधिकारी यांनी ग्रामपंचायत कार्यालय येथे भेट देवुन तक्रार अर्जदार, ग्रामपंचायत सरपंच, पंचायत समिती सदस्य, ग्रामस्थांनी गैर कामकाजाबाबत माहिती व प्रत्यक्ष कामाची पाहणी वरुन अहवाल सादर केला.

या अहवालाच्या आधारे शिंदखेडा पोलीस ठाण्यात तत्कालीन सरपंच श्रीमती इंदुबाई पुंडलिक फुलपगारे, ग्रामसेवक कै.राजेश सुकलाल सुर्यवंशी व योगेश विष्णू महाजन यांच्यावर भादंवि कलम 404, 406,34 प्रमाणे गुन्हयाची नोंद करण्यात आली. तपास पोस्टई पवार कडे देण्यात आला आहे.

या गुन्ह्याची चौकशी सुरू असून भ्रष्टाचारात इतर कोणतेही अधिकारी किंवा कर्मचारी सहभागी आहेत का याचा तपास केला जाणार आहे.

या प्रकरणी तक्रारदार संतोष वाघ यांनी समाधान व्यक्त केले आहे.

शिंदखेडा ( यादवराव सावंत ) प्रतिनिधी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here