Nandurbar News – नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित, साधना विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय ( Sadhna vidyalaya and Junior College ) शनिमांडळ ( Shanimandal ) येथे 3 जानेवारी 2024 रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या ( Savitribai Phule Jayanti ) जयंतीनिमित्त मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला.
यावेळीवेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती डी डी वाडेकर मॅडम यांची निवड करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या प्राचार्य तथा मुख्याध्यापक माननीय श्री कुंदन पाटील सर, पर्यवेक्षक आणि सर्व महिला कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती डी डी वाडेकर मॅडम यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले.
‘एम.डी टीव्ही’ चं Facebook Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!
कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.
हे देखील वाचा:
‘एम.डी टीव्ही’ चं Telegram Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच, महिला भ्रूणहत्या, लेक वाचवा लेक शिकवा, स्रियांचे अस्तित्व, सावित्रीबाई फुले या विषयांवर आधारित नाटिका सादर करण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी साक्षरता गीत, सावित्रीबाई गीत, लेक वाचवा लेक शिकवा, स्री भ्रूणहत्या गीत, शाळेत मुलींना पाठवा गीत असे अनेक गीत देखील सादर केले.

यानंतर विद्यार्थ्यांनी मनोगतात सावित्रीबाई फुले यांच्या जीवन आणि कार्याबद्दल आपली भावना व्यक्त केली. साधना कनिष्ठ विद्यालयाचे प्राध्यापक ए एस पाटील सर, एस व्ही देसले सर, श्रीमती एम एम महाजन मॅडम, एस एस दातीर सर आणि साधना विद्यालय येथील शिक्षिका एस आर वसावे मॅडम यांनी शिक्षक मनोगतात सावित्रीबाईंचे जीवन कार्य शब्दांकित केले.
- Nandurbar News : अक्कलकुव्यात रात्रीच्या अंधारात दगडफेक; २५ दिवसांपासून नागरिक दहशतीत…!
- Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यातील ७ हजार शेतकरी कर्जमुक्तीपासून वंचित; चौथ्या यादीत अवघ्या ४२३ जणांचा समावेश..!
- Thane News Dombivli Sangeet Bhajanotsav Competition: डोंबिवलीत २४ व २५ ऑक्टोबरला भव्य संगीत भजनोत्सव स्पर्धा!
- Nandurbar News MLA Chandrakant Raghuvanshi MSEDCL: दुष्काळात शेतकऱ्यांना ६ तास अखंड वीज द्या; आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची मागणी..!
- Nandurbar News Shahada HDFC Bank Fraud: शहाद्यातील बँकेत वृद्धेची ३३ लाखांत फसवणूक; मॅनेजरसह चौघांवर गुन्हा दाखल..!
कार्यक्रमाच्या शेवटी प्राचार्य श्री कुंदन पाटील सर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी आर वाघ मॅडम यांनी केले, प्रास्ताविका के एस बोरसे मॅडम यांनी केली आणि आभार प्रदर्शन ए आर पाटील सर यांनी केले.

