Nandurbar News : साधना विद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी..!

0
131
Sadhna-vidyalaya-and-Junior-College

Nandurbar News – नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित, साधना विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय ( Sadhna vidyalaya and Junior College ) शनिमांडळ ( Shanimandal ) येथे 3 जानेवारी 2024 रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या ( Savitribai Phule Jayanti ) जयंतीनिमित्त मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला.

यावेळीवेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती डी डी वाडेकर मॅडम यांची निवड करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या प्राचार्य तथा मुख्याध्यापक माननीय श्री कुंदन पाटील सर, पर्यवेक्षक आणि सर्व महिला कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती डी डी वाडेकर मॅडम यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले.

‘एम.डी टीव्ही’ चं Facebook  Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

‘एम.डी टीव्ही’ चं Telegram  Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच, महिला भ्रूणहत्या, लेक वाचवा लेक शिकवा, स्रियांचे अस्तित्व, सावित्रीबाई फुले या विषयांवर आधारित नाटिका सादर करण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी साक्षरता गीत, सावित्रीबाई गीत, लेक वाचवा लेक शिकवा, स्री भ्रूणहत्या गीत, शाळेत मुलींना पाठवा गीत असे अनेक गीत देखील सादर केले.

nandurbar-news-savitribai-phule-jayanti-celebrated-in-sadhana-vidyalaya

यानंतर विद्यार्थ्यांनी मनोगतात सावित्रीबाई फुले यांच्या जीवन आणि कार्याबद्दल आपली भावना व्यक्त केली. साधना कनिष्ठ विद्यालयाचे प्राध्यापक ए एस पाटील सर, एस व्ही देसले सर, श्रीमती एम एम महाजन मॅडम, एस एस दातीर सर आणि साधना विद्यालय येथील शिक्षिका एस आर वसावे मॅडम यांनी शिक्षक मनोगतात सावित्रीबाईंचे जीवन कार्य शब्दांकित केले.

कार्यक्रमाच्या शेवटी प्राचार्य श्री कुंदन पाटील सर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी आर वाघ मॅडम यांनी केले, प्रास्ताविका के एस बोरसे मॅडम यांनी केली आणि आभार प्रदर्शन ए आर पाटील सर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here